शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दहेगावी अपघातात चार ठार; चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:42 IST

मनमाड : जमिनीच्या वादातून दहेगाव शिवारात मोटारसायकलला टॅँकरची धडक देऊन चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅँकरचालक चुलत भावाविरुद्ध चांदवड पोलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संतप्त नातेवाइकांनी अंत्यविधी रोखून धरल्यानंतर सकाळी झालेल्या अपघाताचे रूपांतर रात्री खुनामध्ये झाले. मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात भरधाव टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार ...

ठळक मुद्देदहेगावी अपघातात चार ठार; चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा

मनमाड : जमिनीच्या वादातून दहेगाव शिवारात मोटारसायकलला टॅँकरची धडक देऊन चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅँकरचालक चुलत भावाविरुद्ध चांदवड पोलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संतप्त नातेवाइकांनी अंत्यविधी रोखून धरल्यानंतर सकाळी झालेल्या अपघाताचे रूपांतर रात्री खुनामध्ये झाले. मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात भरधाव टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मयतांमध्ये पती-पत्नीसह माय-लेकाचा समावेश आहे. दरम्यान,सदरची घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.मालेगाव रोडवरील दहेगाव शिवारात पाटील पेट्रोलपंपाजवळ मालेगावकडून मनमाडकडे येत असलेल्या होंडा शाईन गाडीला मालेगावकडून भरधाव वेगात आलेल्या टॅँकरने जोरदार धडक दिली. अपघातानंतर टॅँकरचालकाने टॅँकर पेट्रोलपंपासमोर उभा करून घटनास्थळावरून पळ काढला. अपघात इतका भयानक होता की मोटारसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातामधे संतोष रामभाऊ चितळकर (३५), आशाबाई संतोष चितळकर (३०), भूषण उत्तम चितळकर (१०), सर्व रा. बोयेगाव, ता. नांदगाव हे तिघेजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी सविता उत्तम चितळकर (४०) यांचे मालेगाव येथे उपचार सुरू असताना निधन झाले.रोशन संतोष चितळकर (१०), रा. बोयेगाव याच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मयतांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मालेगाव येथे उपचार सुरू असलेल्या सविता चितळकर यांच्या निधनाची माहिती कळताच नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.