शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौघांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:37 IST

सटाणा : शहरातील डॉ. किरण अहिरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मंगळवारी (दि. ६) मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉ. अहिरे यांच्यासह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सकाळी ११ वाजेपासून सुरू असलेली रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

ठळक मुद्देपतीचा समावेश : संशयिताना घेतले ताब्यात

सटाणा : शहरातील डॉ. किरण अहिरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मंगळवारी (दि. ६) मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉ. अहिरे यांच्यासह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सकाळी ११ वाजेपासून सुरू असलेली रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.शहरात अनेक वर्षांपासून रुग्ण सेवा देणारे डॉ. किरण अहिरे, पं.ध. पाटील नगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्याच ठिकाणी त्यांचा दवाखानादेखील आहे. गेल्या दि. २ आॅक्टोबरला रात्रीच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुषमा अहिरे दवाखान्याच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. त्या गेल्या काही वर्षांपासून एका आजाराने ग्रासल्या होत्या, असे बोलले जात आहे. दरम्यान, सटाणा पोलिसांनी शवविच्छेदन करून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी अचानक डॉ. अहिरे यांच्या निवासस्थानी अपर अधीक्षक निलोत्पल यांच्यासह विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असा पोलिसांचा ताफा दाखल झाल्याने खळबळ उडाली.  त्यात दोन महिलांचा समावेश आहे.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ,मोबाईल कॉल सीडीआर अशा संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजता चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. रात्री उशिरा पर्यंत चौकशी सुरूच होती.मात्र रात्री उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी काही आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्याने मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना नव्याने तपास करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे , जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी दिले आहे. त्यानुसार निलोत्पल यांनी सकाळी एक तास व सायंकाळी एक तास घटना स्थळाची पाहणी केली. यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सुषमा अहिरे यांनी २ आॅक्टोबरला रात्री ११ वाजेच्या दरम्यान घराच्या दुसºया मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घटनेच्या दिवसी पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटना स्थळाची एक तास पाहणी केली. त्या नंतर डॉ.किरण अहिरे यांच्यासह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.