शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

दहा मेंढ्यांसह चार शेळ्या फस्त

By admin | Updated: October 30, 2016 02:08 IST

भोजापूर खोरे : तीन बिबट्यांचा कळपावर हल्ला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथील करवंदरा शिवारात रात्रीच्या वेळेस मुक्कामाला असणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर तीन बिबट्यांनी हल्ला केल्याने १० मेंढ्या व चार शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून, भरदिवसा बिबट्याचा संचार वाढल्याने वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि भाग डोंगराळ व जंगलव्याप्त असल्याने या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. चास-दापूर रस्त्यावर करवंददरा हा परिसर असून, येथे मोठ्या प्रमाणात डोंगर व जंगलाचा परिसर आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर, डिग्रज, मालुंजे आदि भागातील मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या चारण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या भागात आले आहेत. चास येथील चंद्रकांत महादू खैरनार (गट नं. ४१३) यांच्या शेतात साहेबराव बारकू श्रीराम, रा. डिग्रज,ता. संगमनेर यांच्या मेंढ्यांचा कळप मुक्कामी आहे. नेहमीप्रमाणे साहेबराव श्रीराम आपल्या साथीदारांसह दिवसभर मेंढ्या व शेळ्या चारून आल्यानंतर बुधवारी (दि.२७) रोजी रात्रीच्या वेळेस संरक्षक जाळीचा वेढा ओलांडून तीन बिबट्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. रात्रीची वेळ असल्याने बिबट्यांनी अचानक हल्ला केल्याने सर्वत्र गोंधळ उडाला होता.  बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणला होता. एकाचवेळी कळपात तीन-तीन बिबटे मेंढ्यांचे लचके तोडत होते. श्रीराम कुटुंबासमोर हा हल्ला होत असताना त्यांना प्रतिकार करता आला नाही. जखमी केलेल्या काही शेळ्या व मेंढ्या या बिबट्यांनी जंगलाकडे ओढत नेल्या. तेथे त्यांच्यावर ताव मारून अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी आढळून आले. अचानक झालेल्या मेंढ्यांवरील हल्ल्याने उर्वरित मेंढ्या व शेळ्या रात्रभर सैरभर फिरत होत्या. रात्रभर श्रीराम कुटुंबीय मेंढ्या शोधण्यासाठी तळमळ करत होते. अंदाजे १० मेंढ्या व चार शेळ्या फस्त केल्या आहे. परिसरातील रहिवाशांच्या मदतीने जखमी मेंढ्यांवर उपचार करण्यात आले. या घटनेत श्रीराम कुटुंबीयांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  गुरुवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कमळूवाडी शिवारात भाऊराव पांडुरंग जाधव हे शेळ्या राखण करत असताना बिबट्याने त्यांची एक शेळी फस्त केली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)पिंजरा लावण्याची मागणीभोजापूर परिसर हा डोंगराळ भाग असल्याने या भागात नेहमी बिबट्याचा वावर असतो. भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्या नेहमी हल्ले करत असतो. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर तसेच शेतात काम करण्यास मजूर तथा महिला धजावत नाही. या परिसरात नेहमी असे प्रकार घडत असतात. वनविभागसुद्धा याबाबत पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी जगन पाटील भाबड, ग्रामपंचायत सदस्य कचरू यादव खैरनार, परशराम भाबड, नवनाथ खैरनार, आनंदा जाधव आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.