शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गॅसगळतीमुळे आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 16:20 IST

दिंडोरी तालुक्यातील घटना : घरासह संसार आगीच्या भक्ष्यस्थानी

ठळक मुद्देरात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील घरगुती गॅसच्या सिलेंडर मधून गॅसची गळती सुरू झाली. परंतु सदर बाब चौधरी कुटुंबियांच्या लक्षात आली नाही.

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव नजीक धाऊर येथे मळ्यात वास्तव्यास असलेल्या मुरलीधर हरी चौधरी या शेतकऱ्याच्या घराला गॅस सिलिंडरच्या गळतीनंतर लागलेल्या आगीत त्यांच्यासह कुटुंबियातील चार सदस्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.मंगळवारी (दि.१९) रात्री चौधरी कुटुंबीयातील सर्व सदस्य जेवण करून झोपी गेलेले असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील घरगुती गॅसच्या सिलेंडर मधून गॅसची गळती सुरू झाली. परंतु सदर बाब चौधरी कुटुंबियांच्या लक्षात आली नाही. थोड्याच वेळात घराला मोठी आग लागून संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत मुरलीधर हरी चौधरी (वय ३२), त्यांच्या पत्नी कविता मुरलीधर चौधरी (वय ३०), त्यांचा मुलगा तुषार मुरलीधर चौधरी (वय १०) आणि पुतण्या नमन कैलास चौधरी (वय ८) यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून सर्व संसार उपयोगी साहित्यासह मोटरसायकल देखील भस्मसात झाली. घराला लागलेली आग एवढी भयंकर होती की परिसरातील कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत करता आली नाही. दरम्यान, बुधवारी (दि.२०) सकाळी कळवण पोलीस उपविभागाचे विभागीय अधिकारी देविदास वाघमारे, दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्यासह दिंडोरीचे प्रांताधिकारी उदयकुमार किसवे, दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे व दिंडोरी पोलीस करीत आहेत.मदत मिळण्यासाठी प्रस्तावधाऊर येथील मुरलीधर चौधरी या शेतक-याच्या घराला आग लागून त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा दुदैवी मृत्यू झाला. सदर कुटुंबीय दारिद्रय रेषेखालील असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आला आहे- बाबासाहेब गाढवे, तहसीलदारफोटो मेलने पाठवित आहोत...

टॅग्स :Nashikनाशिक