शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओची चार दिवस आॅनलाईन सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:04 IST

प्रादेशिक परिवहन विभागाकडून यापुर्वी वाहनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणारे आर.सी. बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात वाहनधारकांना देण्यात येत होते. त्यासाठी आरटीओ कार्यालय अतिरीक्त शुल्कची आकारणी करीत होते. परंतु स्मार्टकार्डचे काम करणाºया ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर दिड

ठळक मुद्देशुल्क भरू नका : एप्रिलपसून मिळणार स्मार्टकार्ड दिड ते दोन वर्षापासून आरटीओकडून आर.सी. बुक साध्या कागदावर दिले जात

नाशिक : प्रादेशिक परिवहन अर्थातच आरटीओ कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले स्मार्टकार्ड येत्या २ एप्रिल पासून पुन्हा देण्यास सुरूवात केली जाणार असल्याने आपल्या वाहनांबाबत नागरिकांनी दि.२८ ते ३१ या कालावधीत आरटीओच्या आॅनलाईन सेवेत कोणतेही कामकाज न करण्याचे तसेच आरटीओच्या सेवांबाबत कोणतेही शुल्क या काळात न भरण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.प्रादेशिक परिवहन विभागाकडून यापुर्वी वाहनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणारे आर.सी. बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात वाहनधारकांना देण्यात येत होते. त्यासाठी आरटीओ कार्यालय अतिरीक्त शुल्कची आकारणी करीत होते. परंतु स्मार्टकार्डचे काम करणा-या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर दिड ते दोन वर्षापासून आरटीओकडून आर.सी. बुक साध्या कागदावर दिले जात होते. स्मार्टकार्डमध्ये वाहनधारकाची व वाहनाची सारी अद्यावत माहिती नमूद केलेली असल्याने व ते हाताळणे, बाळगणे सोपे असल्यामुळे वाहनधारकांकडून स्मार्टकार्डचा आग्रह धरला जात होता. परंतु ते बंद करण्यात आले होते. आता पुन्हा येत्या २ एप्रिलपासून प्लास्टिक स्वरूपातील स्मार्टकार्ड नोंदणी प्रमाण पत्र जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन नोंदणी होणाºया वाहने, वाहनाचे हस्तांतरण, पत्ता बदल, धनकोची नोंद करणे, कमी करणे, नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत जारी करणे आदी कामे आरटीओच्या आॅनलाईन सेवेच्या माध्यमातून होत असल्याने मंगळवारपर्यंत ज्यांनी या सेवांसाठी अर्र्ज केले त्यांचे काम येत्या चार दिवसात पुर्ण करण्यात येणार आहे. परिणामी दि. २८ ते ३१ पर्यंत आरटीओची कोणतीही सेवा या काळात दिली जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांनी या काळात अर्ज करू नये तसेच आरटीओच्या सेवेबाबत आॅनलाईन शुल्कचा भरणाही न करण्याचे आवाहन केले आहे. २ एप्रिलपासून वाहनधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येणार असल्याने त्यासाठी २०० रूपये अतिरीक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक