शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी ; गैरसोय होण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 20:53 IST

दिवाळीच्या कालावधीत महिन्या अखेर असल्याने नागरिकांना बँकांच्या खात्यावरून व्यावहार करणे अपरिहार्य होणार असताना बँकांना दिवाळी सण आणि चौथा शनिवार यामुळे सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीत तब्बल चार दिवस बंका बंद राहणार असल्याने ग्राहकासोबतच अनेक व्यापाऱ्यांचीही गैरसोय होणार असल्याने पुढचे दोन दिवस बँकांचे व्यवहार करण्यासाठी सोमवारपासून ग्राहकांची गर्दी होऊ शकते.

ठळक मुद्दे खरेदीसाठी ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता ऐन दिवाळी बँकांना चार दिवस सुट्टी

 नाशिक :दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बँकांना शुक्रवारी (दि.२५) धनत्रेयोदशी, शनिवारी (दि.२६) चौथा आठवडा, रविवारी (दि.२७) साप्ताहिक आणि सोमवारी (दि.२८) दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची चांगलीच गैरसोय होण्याची शक्यता असून वेगवेगळ््या प्रकारच्या खरेदी विक्रीसाठी ग्राहकांची मदार एटीएम आणि ऑनलाईन व्यावहारांवर राहणार आहे.

दिवाळीच्या कालावधीत महिन्या अखेर असल्याने नागरिकांना बँकांच्या खात्यावरून व्यावहार करणे अपरिहार्य होणार असताना बँकांना दिवाळी सण आणि चौथा शनिवार यामुळे सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीत तब्बल चार दिवस बंका बंद राहणार असल्याने ग्राहकासोबतच अनेक व्यापाऱ्यांचीही गैरसोय होणार असल्याने पुढचे दोन दिवस बँकांचे व्यवहार करण्यासाठी सोमवारपासून ग्राहकांची गर्दी होऊ शकते. जवळपास सर्वच बँकांनी ऑनलाइन व्यवहारांची सेवा उपलब्ध करून दिली असून, शहरातील ठिकठिकाणचे एटीएमचा ग्राहकांना आधार मिळणार आहे. परंतु अजूनही मोठा वर्ग एटीएम, मोबाइल अ‍ॅप आणि ऑनलाइन व्यवहार करीत नाही. अनेक जण रोखीतच व्यवहार करण्यास पसंती देतात. अशा ग्राहकांना मात्र रोख रकमेची चणचण भासण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा बाजारपेठेवरही थेट परिणाम होण्याची शक्यता अर्थशास्त्र तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

रोकड मिळणे कठीण दिवाळीच्या काळात असलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे बाजारात रोकड टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण घरातील देवी-देवतांसह रोख रकमेचीही पूजा करतात. त्यासाठी अगोदरच बँकेतून रोकड काढली जाते. शिवाय गेल्या काही दिवसांपासून बँकेतून एका दिवसात केवळ २० हजार रुपयेच काढता येत असल्याने बँक खात्यातून रोख रक्कम काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकांसोबतच एटीएममध्येही रोकड अपुरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिकDiwaliदिवाळी