शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत चार कोटींचे नुकसान

By admin | Updated: August 6, 2016 23:17 IST

पावसाचा तडाखा : पुरामुळे शेती, रस्ते, घरांची पडझड

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या जोरदार अतिवृष्टीने कहर केल्याने नद्या, नाले यांना आलेल्या महाभयंकर पुरामुळे शेती, रस्ते, घरांची पडझड व इतर सार्वजनिक मालमत्तेचे असे एकूण सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील वाडीवऱ्हे व नांदगाव बुद्रुक या दोन मंडळात महसूल व कृषी विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. भावली धरण क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दारणा व कडवा धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.इगतपुरी तालुक्यात सरासरी तीन हजार ५०० मिमी पर्जन्यमान होते. जुलै अखेरपर्यंत अवघा एक हजार मिमीच्या आसपास पाऊस झाला होता; मात्र त्यानंतर पावसाने जोरदार मुसंडी मारत तालुक्यात हाहाकार केला. धरणे, नदी, नाले तुडुंब भरून पूर पाण्याने वाहू लागल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. वाडीवऱ्हे मंडळ विभागातील वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, पाडळी, मुकणे, मुरंबी, कुऱ्हेगाव, गडगडसांगवी, लहांगेवाडी आदि तसेच नांदगाव बुद्रुक मंडळातील साकूर, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, जानोरी, कृष्णगर, लक्ष्मीनगर व आदिवासी बारा वाड्यांमध्ये भात, नागली, वरई तसेच ऊस, टमाटे, वांगे, सोयाबीन, काकडी आदि लागवड केलेल्या भाजीपाला पिके भुईसपाट होऊन शेतीही वाहून गेली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी शेतीचे बांध फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुरात बेलगाव येथील पाच म्हशी वाहून गेल्या आहेत. दरम्यान या सर्व गावांमध्ये फिरून बघितले असता शासकीय यंत्रणेकडून जवळपास सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून अद्यापही पंचनामे व शेतकऱ्यांच्या बांधबंदिस्तीचे नुकसान पूर ओसरल्याने समोर येत आहे. विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. (वार्ताहर)