शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बँकांना सलग चार दिवस सुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:42 IST

गेल्या दोन-तीन आठवड्यांत शहरात निर्माण झालेल्या नोटाटंचाईनंतर आता शनिवारपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या असून, शहरातील विविध बँकाही पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे विविध बँकांमध्ये ग्राहकांची शुक्रवारी (दि. २७) गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्राहकांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन रोख रक्कम काढण्यापासून ते विविध कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : गेल्या दोन-तीन आठवड्यांत शहरात निर्माण झालेल्या नोटाटंचाईनंतर आता शनिवारपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या असून, शहरातील विविध बँकाही पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे विविध बँकांमध्ये ग्राहकांची शुक्रवारी (दि. २७) गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्राहकांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन रोख रक्कम काढण्यापासून ते विविध कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिनाअखेरच्या वेळीच बँकांना सुट्या आल्याने ग्राहकांनी वेगवेगळ्या कर्जाचे हप्ते भरणे, उचल व भरण्याचा तपशील घेणे आदी विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला. कारण शनिवारपासून चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँका बंद राहणार असून, त्यानंतर ३० एप्रिलला बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँकांना सुटी आहे. त्यानंतर १ मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. या चार दिवसांच्या सलग सुट्यांमुळे विविध बँकांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी शुक्रवारी बँकेत रांगा लावून बँका बंद होईपर्यंत अत्यावश्यक कामे पूर्ण करून घेतली. दरम्यान, बँकांसोबतच विविध शासकीय कार्यालयांनाही चार दिवस सलग सुट्या आल्याने सरकारी नोकरदारांचीही चंगळ आहे. अनेकांनी या सुट्यांचा फायदा घेण्यासाठी पर्यटनाचे बेत  आखले असून, या काळात वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.पुन्हा चलनटंचाईचे संकटशहरातील चलनटंचाईनंतर परिस्थिती सुधारत असताना बँकांना सलग चार दिवस सुट्या आल्याने पुन्हा एकदा एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवण्याची नागरिकांमध्ये भीती आहे. या चार दिवसांत एटीएममधून सातत्याने पैसे काढले जाणार असताना, बँकांमध्ये होणारा भरणा आणि त्याचा एटीएमला होणारा पुरवठा खंडित होणार आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेकडूनही शहरातील बँकांना अद्याप पुरेशा प्रमाणात नोटांचा पुरवठा होत नसल्याने शहरात पुन्हा चलनटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

टॅग्स :bankबँक