शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सोडणार चार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:40 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे व इतर बसथांब्यांवरील विद्यार्थ्यांसाठी सिन्नर आगारातून सकाळी चार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे बैठकीप्रसंगी एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी यांनी जाहीर केले. आमदार योगेश घोलप यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे व इतर बसथांब्यांवरील विद्यार्थ्यांसाठी सिन्नर आगारातून सकाळी चार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे बैठकीप्रसंगी एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी यांनी जाहीर केले. आमदार योगेश घोलप यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे-पळसे- नानेगाव, जाखोरी- नायगाव सकाळ सत्रातील बसेस महामंडळाने अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांत जाण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच कामगार व इतर प्रवाशांना नाशिकरोड, नाशिक शहरात येण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. सिन्नर डेपोच्या नाशिक शहरात सकाळी येणाºया अनेक बसेस शिंदे पळसे आदि बसथाब्यांवर सकाळी थांबत नव्हत्या बसेस रिकाम्या असताना सुद्धा बसचालक, वाहक बसेस थांबवत नसल्याने दोन दिवसांपूर्वी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी सिन्नरकडून येणाºया बसेस अडवून रास्ता रोको केला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामस्थ व कामगार यांची गरज लक्षात घेऊन आमदार घोलप यांनी एस.टी. महामंडळाच्या अधिकारी यामिनी जोशी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. आमदार घोलप यांच्या कार्यालयात घोलप, विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी, विद्यार्थी व पालकांची संयुक्त बैठक पार पडली. तसेच सिन्नर डेपोतून चार वाढीव बसेस सकाळी ६ ते ८ या वेळेत सोडण्यात येईल व त्या बसेस महामार्गावरील सर्व बसथांब्यावर थांबतील, असे जोशी यांनी स्पष्ट केले. बैठकीला प्रकाश म्हस्के, विद्यार्थी सेनेचे राहुल धात्रक, प्रमोद गायधनी, राजू फोकणे, बबलू टिळे, अंबादास कळमकर, योगेश देशमुख, नवनाथ गायधनी, संजय गायधनी, संजय चिडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.