शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबादला चार दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:17 IST

पंचवटी : मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि़१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याचे कारण समोर आलेले नसून परिसरात दहशत पसरविणे वा अंतर्गत वादातून हा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ या घटनेमुळे सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देरविवारी घटना : नागरिकांमध्ये संताप

पंचवटी : मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि़१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याचे कारण समोर आलेले नसून परिसरात दहशत पसरविणे वा अंतर्गत वादातून हा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ या घटनेमुळे सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील रहिवासी विजय भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोसायटीतील सभासदांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये रविवारी (दि़१५) नेहेमीप्रमाणे आपल्या दुचाकी उभ्या केलेल्या होत्या़ मध्यरात्री सुमारे दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास परिसरातील काही अज्ञात समाजकंटकांनी दहशत पसरविण्याच्या हेतूने पार्किंगमध्ये लावलेली भामरे यांच्या मालकीची प्लेटिना ( एमएच १५, एफके ९४१५), शारदा बुरकुले यांची हिरोहोंडा पॅशन (एमएच १५, डीडी ०११०), संतोष मोरे यांची प्लेजर (एमएच १५, डीक्यू ९४२२) तसेच सुरेश मोरे यांची एम ८० (एमएच १५, एक्स ३५१०) या चार दुचाकींना आग लावली़ इमारतीत काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने नागरिक जागे झाले व त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली़पंचवटी अग्निशमन दलाचे जवान हे बंबासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत तीन दुचाकी या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, दुचाकीमालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़ काही महिन्यांपूर्वीच म्हसरूळ परिसरात वाहनांच्या काचा फोडणे तसेच जाळपोळ केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला मखमलाबाद शिवारात पुन्हा अशाप्रकारे चार दुचाकींची जाळपोळ केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़कारवाईची मागणीपंधरा दिवसांपूर्वीच पंचवटीतील सीतागुंफा रोडवरील शिवाजी चौकातील रस्त्यालगत उभ्या केलेल्या तीन ते चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़ या घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांनी परिसरातून धिंडही काढली होती़ म्हसरूळ पोलिसांनी दुचाकी जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

टॅग्स :Crimeगुन्हा