शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत साडेतीन लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:40 IST

हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहरात गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जात आहे. या चार दिवसांत १ हजार ३०४ बेशिस्त वाहनधारकांनी सुमारे ३ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांना भरला आहे.

ठळक मुद्देहेल्मेट तपासणी मोहीम : एक हजार ३०४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

नाशिक : हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहरात गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जात आहे. या चार दिवसांत १ हजार ३०४ बेशिस्त वाहनधारकांनी सुमारे ३ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांना भरला आहे. चौथ्या दिवशी रविवारी (दि.१७) २४७ पेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चालूवर्षी ११ महिन्यांत १३९ नाशिककरांचा रस्त्यांवर अपघाती मृत्यू झाला आहे. हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने ६७ दुचाकीस्वारांचा बळी गेला. तसेच दहा चारचाकीचालकांनी सीटबेल्टचा वापर न केल्याने त्यांचाही अपघाती मृत्यू झाला. अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून वारंवार जनजागृती मोहीम, दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र तरीदेखील काही दिवसांनी नाशिककरांमध्ये पुन्हा उदासीनता निर्माण होते आणि हेल्मेट, सीटबेल्टच्या वापराकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे गुरुवारपासून येत्या रविवारपर्यंत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस व संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी मिळून संयुक्तरीत्या विशेष मोहीम राबविली जात आहे. वाहतूक नियम न पाळणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी केली जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत शहरात वाहने दामटविणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर वाहने उतरविल्यानंतर कुठल्याहीप्रकारच्या वाहतुकीच्या नियमाकडे कानाडोळा करता कामा नये, तसे आढळून आल्यास संबंधितांकडून दंड आकारण्यात येणार आहे.दणका : रविवारी ६१ हजार वसूलमोहिमेच्या चौथ्या दिवशी शहरात सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी दोन तासांत २४७ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करत ६१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये ४० विनाहेल्मेटधारक दुचाकीस्वार, २५ सीटबेल्ट न लावणारे चारचाकीचालकांसह ३५ बेशिस्त रिक्षाचालकांविद्ध पोलिसांनी कारवाई केली. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयroad safetyरस्ते सुरक्षा