सन १८९२ नंतर सुमारे चाळीस वर्षांनी महात्मा गांधी हे १९३२-३३ मध्ये नाशिकच्या गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर वसंत व्याख्यानमालेत भाषण देण्यासाठी आले होते. पगडबंद लेनमधील मोठ्या वाड्यात एका गुजराथी कुटुंबाकडे ते उतरले होते. त्याकाळी डॉ. कूर्तकोटी शंकराचार्य हे वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष होते. ते पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी व्याख्यानमालेत बोलण्यासाठी गांधीजींना आमंत्रित केले होते, असे ज्येष्ठ पत्रकार शरद बुरकुले यांनी सांगितले. आपल्या वडिलांनी ही आठवण आपल्याला सांगितल्याचेही ते म्हणाले.
चाळीस वर्षांनंतर वसंत व्याख्यानमालेत...
By admin | Updated: October 2, 2014 00:18 IST