शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्टीव्हा ते फॉर्च्युनर... भावी प्रगतीसाठी शुभेच्छा

By admin | Updated: February 23, 2017 00:07 IST

मिश्किली : म्हणे, मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र

नाशिक : सर्व भावी नगरसेवकांना पुढील पाच वर्षांमध्ये अ‍ॅक्टीव्हा ते फॉर्च्युनर या भावी प्रवासासाठी शुभेच्छा... अशा प्रकारचे अनेक मिश्कील संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, निमित्त आहे ते महापालिका निवडणुकीच्या निकालाचे!महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मिश्कील आणि काही व्यंगात्मक संदेश फिरत होते. त्यातून अनेकांकडून सामान्य नागरिकांच्या भावना व्यक्त होत होत्या. आता मतदान संपल्यानंतरही अनेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते... या गझलकार सुरेश भट यांच्या रचनेवर आधारित... इतकेच मला जाताना, पोलिंग बूथवर कळले होते, मतदानाने केली सुटका, प्रचाराने छळले होते... अशी टिप्पणी व्हायरल झाली होती. निवडणुकीच्या आधी दुचाकीवर फिरणारे नंतर मात्र पाच वर्षांत मोठ्या मोटारींमध्ये फिरू लागतात. त्यांच्या या प्रगतीने सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्य वाटते, त्यावर आधारित एक संदेश फिरत आहे. भावी नगरसेवकांना पुढील पाच वर्षांमध्ये अ‍ॅक्टीव्हा ते फॉर्च्युनर या भावी प्रचारासाठी हार्दिक शुभेच्छा... यातून सर्वसामान्य नागरिकांच्या नगरसेवकांविषयी काय भावना होतात, हेच स्पष्ट होते. निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप- प्रत्यारोप करणारे आणि एकमेकांची औकात काढणारे पक्ष नंतर मात्र सोयीची भूमिका घेतात. त्यावर आधारितही पोस्ट व्हायरल होत आहेत... उद्या संध्याकाळपासून एक घोषणा ऐकायला येईल, ‘मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे...’या पोस्ट सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या असल्याने त्या अधिक बोलक्या ठरल्या आहेत.