शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गप्रेमींची हरिहर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:47 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या रांगेत असलेल्या देवगाव परिसरातील हरिहर किल्ल्याची शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेने स्वच्छता मोहीम ...

ठळक मुद्देदेवगाव : महिलांसह चिमुकल्यांनीही घेतला सहभाग

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या रांगेत असलेल्या देवगाव परिसरातील हरिहर किल्ल्याची शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेने स्वच्छता मोहीम केली.देवगावपासून १० किमी अंतरावर आणि ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीचा त्रिकोणी आकार असलेला हरिहर किल्ला आहे. चढाईसाठी कठीण असलेल्या हर्ष किल्ल्याच्या पायऱ्या थेट कातळात कोरलेल्या आहेत. गिरीदुर्ग प्रकारात मोडलेल्या या किल्ल्याचा पायऱ्यांचे खास वैशिष्ट्य आहे.प्रथमत: किल्ल्यावरील सर्व चॉकलेट, बिस्कीट, वेफर्स व कुरकुरे यांचे रॅपर तसेच रिकाम्या पाण्याच्या बाटल्या एकत्र जमा करण्यात आल्या. दुपारी जेवणानंतर किल्ल्यावरील पाण्याच्या तलावाच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेले मोठे दगडं तलावातून काढून तलाव स्वच्छ करण्यात आला. विशेष म्हणजे, तलावातील गाळ व दगडं काढण्यासाठी संस्थेच्या सभासदांची एक साखळी तयार करून पाण्यातून बाहेर काढण्यात आले. स्वछता मोहिमेच्या कार्यात महिला तसेच लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, हे कार्य करत असताना मनस्वी आनंद झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.मोहिमेमध्ये श्याम गव्हाणे,सोमनाथ गव्हाणे,विजय दराने,विजय महाले,बाळासाहेब शिंदे,लखन पाळदे,वैशाली गव्हाणे,आर्यन गव्हाणे,कृष्णा गव्हाणे,सई गव्हाणे,साक्षी गव्हाणे,मदन मुठाळ,रवी राव,राम दाते,सागर पाटील,पूजा शिंदे,कोमल शिंदे,अपूर्वा शिंदे,कविता गव्हाणे आदींनी सहभाग नोंदविला. तसेच शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे पालघर शाखेचे अमित पाटील,चेतन पाटील,धीरज पाटील,कुणाल पाटीलही सहभागी झाले होते.   

टॅग्स :FortगडSocialसामाजिक