शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गडावर दुर्गाष्टमीला भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:10 IST

सप्तशृंगगडावर आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगीदेवीच्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमीनिमित्त पालखी मिरवणूक गड परिसरात काढण्यात आली. देवीभक्तांनी मनोभावे दर्शन घेऊन पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. दुर्गाष्टमीला ५० हजार देवीभक्त देवीचरणी नतमस्तक झाले.

कळवण : सप्तशृंगगडावर आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगीदेवीच्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमीनिमित्त पालखी मिरवणूक गड परिसरात काढण्यात आली. देवीभक्तांनी मनोभावे दर्शन घेऊन पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. दुर्गाष्टमीला ५० हजार देवीभक्त देवीचरणी नतमस्तक झाले.भगवतीची पंचामृत महापूजा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे व कळवण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उषा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होते. आज सकाळी ७.३० वाजता श्री सप्तशृंगीदेवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ८ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. गुरुवारी दुपारी १२ वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातील बहुसंख्य भाविक महाआरतीला मंदिर परिसरात उपस्थित होते. देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधीदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. राज्यभरातून विविध भागातून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.