शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

दहावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST

नाशिक : दहावीच्या निकालासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्राची ...

नाशिक : दहावीच्या निकालासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्राची रुतलेले चक्र पुन्हा फिरणार असल्याने विद्यार्थी व पालकांनासह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून, दहावीच्या निकालासाठी निश्चित करण्यात आलेल्या अंतर्गत मूल्यामापनाच्या सूत्राचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत आहे.

कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कशा पद्धतीने जाहीर होणार, याकडे लाखो विद्यार्थी व पालकांसह शिक्षक आणि संस्थाचालकांचेही लक्ष लागले होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनीही यांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धत निश्चित झाल्याने आता लवकरात लवकर निकाल तयार करून तो जाहीर केल्यास विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर होऊ शकेल, अशी अपेक्षाही विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोट-

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे आवश्यकच होते. त्यांना भविष्यात या गुणपत्रिकांची गरज भासणारच आहे. परंतु, नव्या पद्धतीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करताना शिक्षकांना अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाची पद्धती सोपी करायला हवी होती. मूल्यमापनासाठी शिक्षकांना शाळेत येऊन जास्त वेळ काम करावे लागेल.

- राजेंद्र निकम, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी

कोट-

कोरोनाचे संकट लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक दडपण कमी करणारा चांगला निर्णय घेतला असून, शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा अशा प्रकारे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणे योग्यच आहे. अनेक विद्यार्थी दहावीचे पहिले सत्रही ऑनलाइन अथवा ऑफलाइन शिक्षण घेऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मूल्यमापन करणे आवश्यक आहे; परंतु त्यासाठी शिक्षकांवरचा कामाचा ताण वाढणार असून त्यासाठी अपेक्षापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- गुलाबराव भामरे, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल

कोट-

दहावीच्या निकालासंदर्भात शासन निर्णयाचे माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने स्वागत आहे. शासनाने नववीच्या ५० टक्के गुणांचा विचार करून दहावीचा निकाल तयार करण्याचा विचार केल्याने ही बाब विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व वास्तववादी आहे. मात्र, दहावीच्या निकालानंतर अकरावीचा प्रवेशासाठी काठीण्य पातळी तपासणे अडचणीचे होणार आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यस्तरावर समान नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

- मोहन चकोर, अध्यक्ष, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघ

---

इन्फो -

शंभर गुणांच्या मूल्यमापनाचे सूत्र असे

-नववीच्या विषयनिहाय अंतिम निकालातील ५० टक्के गुण

-दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० टक्के गुण

- दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २० टक्के गुण

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी

मुले - ५२,८०३

मुली -४६,१४६

एकूण- ९८,९५९

===Photopath===

290521\29nsk_8_29052021_13.jpg~290521\29nsk_9_29052021_13.jpg~290521\29nsk_10_29052021_13.jpg

===Caption===

प्रतिक्रियांसाठी फोटो~प्रतिक्रियांसाठी फोटो~प्रतिक्रियांसाठी फोटो