शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार संजय चव्हाण यांची जमीन सरकारजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:42 IST

नाशिक : बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण हे स्वत:ला आदिवासी असल्याचे सिद्ध करू न शकल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आदिवासी म्हणून खरेदी केलेली जमीन सरकार जमा करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता यांनी बुधवारी (दि. २७) दिले आहेत. या आदेशाने संजय चव्हाण यांना बनावट जातप्रमाणपत्राचे प्रकरण अंगलट आले आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांचे आदेश : बनावट जातप्रमाणपत्र अंगलट

नाशिक : बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण हे स्वत:ला आदिवासी असल्याचे सिद्ध करू न शकल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आदिवासी म्हणून खरेदी केलेली जमीन सरकार जमा करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता यांनी बुधवारी (दि. २७) दिले आहेत. या आदेशाने संजय चव्हाण यांना बनावट जातप्रमाणपत्राचे प्रकरण अंगलट आले आहे.             मौजे ठेंगोडा, ता. बागलाण येथील आदिवासीच्या गट नंबर ३०९/१च्या सातबारा उताऱ्यावरील बिगरआदिवासी वारसांची बेकायदेशीर लावलेली नोंद रद्द करण्याबाबत उमाजीनगर (ठेंगोडा), ता. बागलाण येथील आदिवासी बांधव दिलीप सीताराम पिंपळसे व इतरांनी २८ डिसेंबर २०२० रोजी तहसील कार्यालयाकडे विनंती अर्ज दाखल केलेला होता. त्या अर्जानुसार, सुलोचना कांतिलाल चव्हाण यांनी ती जमीन मूळ मालक लाला धनाजी माळी यांना फसवून सन २०१३मध्ये खरेदीखत केले असून, फेरफार क्रमांक ७६५२ने त्यांचे नाव त्या जमिनीस लागले आहे. त्यानंतर त्या जमिनीवर संजय कांतिलाल चव्हाण व इतरांची नावे वाटप नोंद दाखल झालेली आहे.

              ह्या सर्व नोंदी बेकायदेशीर असून, संजय कांतिलाल चव्हाण हे आदिवासी नसतानाही त्यांनी ती जमीन आदिवासी असल्याचे दाखवून खरेदी केली आहे. त्यांचे आदिवासी ठाकूर जातीचे प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे आदिवासीची जमीन बिगरआदिवासी व्यक्तीने खरेदी करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांची नावे सदर गटाचे कब्जेदार सदरातून कमी करून तेथे राहत असणाऱ्या जवळपास २०० लोकांची नावे दाखल करावी किंवा आदिवासीची जमीन बिगर आदिवासी असलेल्या संजय कांतिलाल चव्हाण यांचे व त्यांचे कुटुंबीयांचे नावे कमी होऊन सदर जमीन सरकारजमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली होती. त्यावर सुनावणी होऊन तहसीलदारांनी त्या जमिनीवर बिगरआदिवासी खातेदारांची नावे दाखल झालेली असल्यामुळे त्यांची नावे कमी करून जमीन सरकारजमा करण्याचे आदेश काढले आहेत.अजूनही टांगती तलवारजमीन खरेदी करणाऱ्या सुलोचना कांतिलाल चव्हाण ह्या आदिवासी खातेदार नसल्याचे सिद्ध होते. त्यामुळे मौजे ठेंगोडा, ता. बागलाण येथील गट नं. ३०९/१ च्या सातबारा सदरी असलेल्या जमिनीवरील संजय कांतिलाल चव्हाण व इतर यांची नावे कमी करण्यात येऊन त्याठिकाणी सरकारचे नाव दाखल करण्यात यावे, असा आदेश तहसीलदारांनी दिला आहे. या आदेशामुळे माजी आमदार संजय चव्हाण यांच्यावर अजूनही काही जमिनी सरकारजमा होण्याची टांगती तलवार आहे.तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही. परंतु, असा काही आदेश असेल तर तो चुकीचा आहे. त्याबाबत पुढे काय निर्णय घ्यायचा, हे कायदेशीर सल्ला घेऊन ठरवू. मुळात मी सदर जमीन खरेदी केलेलीच नाही. ती मला आईकडून वारसाहक्काने आलेली आहे.- संजय चव्हाण, माजी आमदार

टॅग्स :Governmentसरकारbaglan-acबागलाण