त्यानंतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर भोसले आणि आयुक्त कैलास जाधव यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आयुक्तांनी नगररचना विभागाच्या सूत्रांना बांधकाम परवानग्या तपसाण्याचे आदेश दिल्यानंतर भोसले यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.
कर्मयोगीनगर भागात नैसर्गिक नाले बुजवून बांधकामे हेात असल्याची तक्रार यापूर्वीही भोसले यांनी केली होती. दरम्यान, महापालिकेकडून कार्यवाही तर होत नाही उलट बांधकामे होत असल्याने पावसाळ्यात नगरसेवकांच्या घरात पाणी साचते. त्यामुळे भोसले सोमवारी (दि.५) आयुक्त कैलास जाधव यांना भेटण्यासाठी गेले हेाते. मात्र, पूर्वपरवानगीशिवाय ते आल्यामुळे ऐनवेळी अधिकाऱ्यांना बोलावून तत्काळ बैठक घेणे संयुक्तिक होणार नाही. बाहेर अभ्यागत पूर्वनियोजित वेळ घेऊन आले असल्याने त्यांना थांबवता येणार नाही, असे आयुक्तांनी सांगितल्यावर शुक्रवारी या विषयावर चर्चा करण्यास सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांना बोलावून तत्काळ चर्चा करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करत भोसले यांनी आयुक्तांच्या दालनासमेारच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे नाशिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यासंदर्भात काही नगरसेवकांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी नितीन भाेसले आणि आयुक्त यांच्यात चर्चा झाली, यावेळी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले हेाते, आयुक्तांनी नाले बुजवण्याचे काम करणाऱ्यांची तातडीने चाैकशी करून माहिती देण्याचे आदेशित केले, असे भोसले यांनी सांगितले.
कोट..
अभ्यागतांची पूर्वनियोजित वेळ असल्याने माजी आमदार अचानक आल्यानंतर तातडीने बैठक घेणे शक्य नव्हते. त्यांना तसे सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन केले. नाले बुजवू नये यासाठी मी यापूर्वीच सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
------------
छायाचित्र आर फोटोवर ०५ नितीन भोसले