शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री घोलप यांना सव्वा लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:03 IST

नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांची विविध आमिषापोटी फसवणूक होण्याचे प्रकार शहरात सर्रास होत असतात; मात्र आता चक्क राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांना तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांची विविध आमिषापोटी फसवणूक होण्याचे प्रकार शहरात सर्रास होत असतात; मात्र आता चक्क राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांना तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवळालीगाव परिसरात वास्तव्यास असलेले घोलप यांनी भ्रमणध्वनी क्रमांकावर आलेला लघुसंदेश वाचून संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी भामट्याने व्हीआयपी सीमकार्डबाबत माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला. ८४४४४४४४४४ या व्हीआयपी क्रमांकाची भुरळ घोलप यांना घालून त्याने वेळोवेळी पैसे उकळले. व्हीआयपी क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिषही घोलपांना दाखविले गेले. घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्याने त्यांच्याकडून तब्बल एक लाख ३३ हजार रुपये नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आले; मात्र त्यानंतर संपूर्ण पैसे भरूनही कुठल्याही प्रकारे वस्तू व सेवा पुरविली नसल्याचे लक्षात आल्यानंतर भामट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला.नोव्हेंबरमध्ये फसवणूक१ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वेळोवेळी भारतीय एअरटेल एंटरप्रायजेस तलवाररोड शाखा, जयपूर, संतोष राठोड कोटक महिंद्र शाखा जयपूर या नावाने असलेल्या बॅँक खात्यामध्ये घोलप यांनी रक्कम जमा केली. सुरुवातीला तीस हजार रुपये एंटरप्रायजेस खात्यावर त्यांनी जमा केले त्यानंतर राठोड नावाच्या भामट्याच्या खात्यावर घोलप यांनी दोन वेळा व्यवहार करत ५४ हजार व २९ हजार १२६ रुपये जमा केल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घोलप यांनी रविवारी (दि.४) नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दिला असून, त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.भ्रमणध्वनी क्रमांक स्विच आॅफघोलप यांना ज्या क्रमांकावरून लघुसंदेश धाडला गेला व वेळोवेळी त्यांच्यासोबत मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. अशी सर्व भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी घोलप यांनी तक्रार अर्जात नमूद केली आहे; मात्र यापैकी एकही भ्रमणध्वनी क्रमांक सुरू नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्णात संशयित भामट्यांनी जरी मोबाइलचा वापर करत फसवणूक केली असली तरी नाशिकरोड पोलीस ठाण्यात केवळ फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल असून, सायबर गुन्ह्णाची कुठलेही कलम नोंदविण्यात आलेले नाही हे विशेष !

टॅग्स :Nashikनाशिक