शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जिल्ह्यातील वनांमध्ये वृक्षसंपदेवर कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:28 IST

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या वनांमध्ये लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात तस्कर टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात पेठ, हरसूल वनपरिक्षेत्रांमध्ये वनविभागाच्या गस्तीपथकाने छापेमारीचे सत्र सुरू करून सुमारे दीड लाख रुपयांचा अवैधरीत्या दडवून ठेवलेला तोडलेल्या सागाच्या लाकडांचा अडीच घनमीटर इतका साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देसाग, खैराची कत्तल : पेठमधून दीड लाखांचा सागाचा साठा जप्त

नाशिक : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या वनांमध्ये लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात तस्कर टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात पेठ, हरसूल वनपरिक्षेत्रांमध्ये वनविभागाच्या गस्तीपथकाने छापेमारीचे सत्र सुरू करून सुमारे दीड लाख रुपयांचा अवैधरीत्या दडवून ठेवलेला तोडलेल्या सागाच्या लाकडांचा अडीच घनमीटर इतका साठा जप्त केला आहे. सर्वाधिक कारवाया पेठ भागातील नदी-नाल्यांच्या ठिकाणी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती गावांमध्ये करण्यात आल्या आहेत. एकूणच नाशिकच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या तालुक्यांतील वनांमध्ये असलेल्या वृक्षसंपदेवर सध्या ह्यकुºहाडह्ण कोसळत आहे.नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पेठ वनपरिक्षेत्रामध्ये गांडोला गावालगत महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातून सागाचे २३ नग असा एकूण १ घनमीटर लाकूडसाठा वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांच्या रात्रपाळीच्या गस्तीपथकाने जप्त केला. त्याची बाजारभावाप्रमाणे ३५ हजार रुपये इतकी किंमत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याच भागातील आंबा वन परिमंडळमधून रविवारी (दि १९) सकाळी ८ ते दहा सागाचे ३० मी.उंच वाढलेले फुटवे लाकुडतोड्यांनी कापून दडवून ठेवलेले होते, तेदेखील पथकाने जप्त केले. वनपाल डी. डी. पवार, परदेशी, गवळी, वनरक्षक बी. डी. चौधरी, देशमुख, दळवी, शेख यांचा कारवाई पथकात समावेश होता.हरसूल वनपरिक्षेत्रांतील देवडोंगरी गाव हे अगदी गुजरात सीमेला लागून आहे. या गावाच्या वनांमध्ये खैर, साग यांसारखी मौल्यवान वृक्षसंपदा आढळते. येथील तस्करांनी खैराची दोन मोठी वृक्ष कापून टाकली. या झाडांच्या कापलेल्या सगळ्या फांद्या, बुंधे तस्करांनी तुकडे करून वाहून नेण्यासाठी दडवून ठेवलेले होते. लॉकडाउन काळात वाहन उपलब्ध होत नसल्याने सीमावर्ती भागातील नाशिक जिल्ह्यातील वनांमध्ये तोडलेला माल दडवून ठेवण्यात आला होता याबाबत वनविभागाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. यानंतर सातत्याने हरसूल, पेठ या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये मुसळे यांनी छापेमारी सुरू केली आहे. या आठवड्यात एकूण पाच ते सहा ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये एकूण एक ते दीड लाख रुपये किमतीचा अडीच घनमीटर सागवान लाकूडसाठा पेठ वनपरिक्षेत्रामध्ये जप्त करण्यात आला आहे.वृक्षतोडीबरोबरच वन्यजिवांची शिकारीची समस्या लॉकडाउन काळात पुन्हा उद््भवली आहे. रानडुकरे, मोर, रानससे यांसारख्या वन्यजिवांची शिकार करण्यासाठीदेखील घूसखोरी या लॉकडाउन काळात वाढली आहे. या परिक्षेत्रात विविध गावोगावी असलेल्या वनांमध्ये गस्तीपथकाने संशयितांचा माग काढला असता अवैधरीत्या फिरस्ती करताना काही लोक दिसून आले मात्र पथकाला बघताच शिकाऱ्यांनी हातातील शस्त्र टाकून पळ काढला. या भागातून कुºहाड, भाले असे साहित्य जप्त केले.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग