शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक भरती प्रक्रीया : आमिषावर विश्वास ठेवाल तर आर्थिक फसवणूकीचे बळी व्हाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 20:01 IST

काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे

ठळक मुद्देनाशिक वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत१७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले२० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित

नाशिक :नाशिक, अहमदनगर वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत. यासाठी नुकतीच १२० गुणांची लेखी परीक्षा आॅनलाइन पध्दतीने घेतली गेली. नाशिक वनृत्तासाठी तब्बल ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेत ४५टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना शारिरिक मैदानी चाचणीला आता सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, वनरक्षक भरती प्रक्रिया संपुर्णपणे पारदर्शी राबविली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित असून अवैध मार्गाने जे उमेदवार या भरती प्रक्रीयेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सांगितले. त्यामुळे कु ठल्याही प्रकाररे आमिष, प्रलोभनांवर उमेदवारांनी विश्वास न ठेवता संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रीया राबविली जात आहे. याअंतर्गत नाशिक वनवृत्तात केवळ ४४पदे भरावयाची आहेत. त्यासाठी एकूण ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून लेखी परिक्षेत फक्त १७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले. या उमेदवारांची येत्या मंगळवारी (दि.१३) या उमेदवारांची शारिरिक तपासणी तसेच आवश्यक त्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांनी येत्या २० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार आहे. स्थानिक आदिवासी तालुक्यांमधील तरूणांसाठी २६ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. यासाठी त्यांनाही भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमधून जावे लागणार आहे.वनरक्षक भरती प्रक्रीया ही संपुर्णत: पारदर्शी आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबविली जात आहे. त्यामुळे या भरतीत कुठल्याहीप्रकारे अवैध बाबींना थारा नसल्याचे फुले यांनी स्पष्ट केले आहे. काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे, तसेच गैरमार्गाचा क ोणीही अवलंब करत असल्याचा संशय आल्यास त्याबाबत थेट तक्रार करावी, योग्य तक्रारींची निश्चित स्वरूपात दखल घेतली जाईल, असेही फुले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग