शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांना घरी परतण्याची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:52 IST

सिन्नर :कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने स्थलांतरित कामगारांसाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सिन्नर (सचिन सांगळे)कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने स्थलांतरित कामगारांसाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या ३५ दिवसांपासून पाच परप्रांतीय येथे आश्रयास असून, त्यांना आता घरी परतण्याची आस लागली आहे. शासन पातळीवर त्याकरिता उपाययोजना केल्या जात आहेत.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे हे गाव नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती व नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणी दोन चेक पोस्ट व एक निवारागृह मार्च महिन्यात उभारण्यात आले होते. निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पाठारे, तहसीलदार राहुल कोताडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पुढाकाराने नांदूरशिंगोटे येथील संदीप हॉटेलचे मालक संदीप भाबड यांनी मंगल कार्यालयात निवारागृह उपलब्ध करून दिले आहे. २ एप्रिल रोजी पुणे रस्त्याने पायी येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना येथील निवारागृहात क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. सुरुवातीपासून गुजरात राज्यातील आंनद जिल्ह्यातील पाच मजूर येथे आहे.या सर्व मजुरांवर लक्ष ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित मजुरांना शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच गॅस व शेगडी तसेच भाजीपाला, साबण, टुथपेस्ट, किराणा आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीमार्फत परिसर निर्जंतुकीकरण करून तसेच पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून सहकार्य केले जात आहे. सरपंच गोपाळ शेळके, पंचायत समिती सभापती शोभा बर्के, संदीप भाबड, संजय पावडे यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. सिन्नर येथील युवामित्र संस्था तसेच स्थानिक नागरिक यांनीही जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्याचे मंडळ अधिकारी व्ही. पी. शिरसाट व तलाठी शीतल जाधव यांनी सांगितले. गेल्या पस्तीस दिवसांपासून येथील निवारागृहात असलेल्या पाच परप्रांतीयांना घरी जाण्याची आस लागलेली आहे.महसूल विभागाच्या तलाठी जाधव यांनी दोन दिवसापासून त्यांचे ई पास फार्म भरण्यात आलेले आहेत. गुजरात येथे त्यांना जाण्यासाठी सर्व नियोजन सुरु आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक