शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी वृक्षप्रेम ठेकेदाराला भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:01 IST

राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत महापालिकेने साडेसतरा हजार रोपे लावून उद्दिष्टपूर्ती केली खरी, परंतु सदरचे काम करताना प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पंचवटीत परस्पर अडीचशे विदेशी प्रजातीची काशिदाची झाडे लावल्याने धावपळ उडाली.

नाशिक : राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत महापालिकेने साडेसतरा हजार रोपे लावून उद्दिष्टपूर्ती केली खरी, परंतु सदरचे काम करताना प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पंचवटीत परस्पर अडीचशे विदेशी प्रजातीची काशिदाची झाडे लावल्याने धावपळ उडाली. उद्यान विभागाने तातडीने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून, देशी प्रजाती झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा देयक अदा केले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने यंदाच्या वनमहोत्सवात १३ कोटी झाडे लावण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात नाशिक महापालिकेला १२ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट नगरविकास विभागाने दिले होते. महापालिकेने त्यासाठी निसर्ग लॅँड स्केप या कंपनीला कंत्राट दिले असून १ महिन्याच्या आत इतकी रोपे लावून त्याची देखभाल व दुरुस्ती अठरा महिने करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र २८ जुलै रोजी संबंधित ठेकेदाराने परस्पर सर्व्हे नंबर २५७ व २५९ म्हसोबावाडी येथे सुमारे अडीचशे विदेशी काशिदाची झाडे लावली होती.  विशेष म्हणजे ठेकेदाराशी महापालिकेने केलेल्या करारांत काशिद प्रजातीच्या झाडांचा समावेश नाही. इतर प्रजातीची वृक्षलागवडीसाठी परस्पर लागवड करण्यास येऊ नये, असे समक्ष सांगितले असतानाही परस्पर रोपे लावण्यात आल्याने सदरची करारानुसार वृक्षलागवड करावी तसेच रोपांची गुणवत्ता तपासून स्पेसिफिकेशनप्रमाणेच वृक्षलागवड करावी अन्यथा परस्पर वृक्षलागवड केल्यास त्याचे देयक देता येणार नाही. अन्यथा या कामात कुठल्याही प्रकारचे स्वारस्य नसल्याचे गृहीत धरून कार्यवाही करण्यात येईल, असे उद्यान अधीक्षकांनी बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे.  कंत्राटी पध्दतीने रोपे लावण्यास मुळातच स्थायी समितीत विरोध झाला होता. परंतु त्यानंतरही हा ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आणि त्यानंतर शासनाच्या वनमहोत्सवाअंतर्गत घाईघाईने ठेकेदारास कंत्राट देऊन कामकाज सुरू करण्यात आले त्यात हा प्रकार घडला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका