शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

परराज्यातील पणत्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:45 IST

ममदापूर : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पणत्यांना मोठी मागणी असते. दिवाळीच्या तोंडावर परराज्यातील पणत्या बाजारात दाखल झाल्याने स्थानिक कुंभार कारागिरांना मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देयेवला : स्थानिक कारागिरांना फटका

ममदापूर : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पणत्यांना मोठी मागणी असते. दिवाळीच्या तोंडावर परराज्यातील पणत्या बाजारात दाखल झाल्याने स्थानिक कुंभार कारागिरांना मोठा फटका बसला आहे.कुंभार कारागिरांनी वर्षभर राबून दिवाळी सणासाठी मोठ्या संख्येने पणत्यांची निर्मिती केली आहे. मात्र ऐन सणाला पणत्यांची मागणीच घटल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत आले आहेत.कुंभार समाज मातीपासून मूर्ती, भांडी, विटा तयार करण्याचे पारंपरिक काम करीत आहे. या पारंपरिक व्यवसायावर कोरोनाने गदा आणली. वाढत्या महागाईने आधीच स्थानिक कारागिरांच्या व्यवसायाला घरघर लागली असताना आता परराज्यातून मातीच्या वस्तू दाखल होत असल्याने स्थानिक कारागीर अडचणीत सापडले आहेत.स्थानिक कुंभार व्यावसायिक दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पारंपरिक पणत्यांप्रमाणे सप्तदीप, पंचदीप, कासवाची जादुई पणती, लक्ष्मीपाद, कंदील अशा विविध प्रकारचे दिवे बनवतात. दोन महिने अगोदरपासून या कामांची लगबग सुरू होते. पणत्या, महालक्ष्मी मूर्ती तसेच लहान मुलांसाठी मातीची खेळणी तयार केली जाते. परंतु या दिवाळीत परराज्यातील पणत्या, चिनीमातीच्या पणत्या, लायटिंग असलेल्या पणत्या बाजारात आल्याने मातीच्या पणत्यांना ग्राहकांकडून मागणी घटली आहे. मातीच्या महालक्ष्मीच्या मूर्तीऐवजी पीओपीच्या मूर्ती ज्या अधिक सुबक दिसतात त्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे.अनेक पिढ्यांपासून आम्ही हा मातीकलेचा व्यवसाय करत आहे. परंतु बाजारात आता प्लास्टिक, सिमेंट, पीओपी, चिनी मातीच्या पर्यायी वस्तू दाखल होत असल्याने आमचा व्यवसायावर परिणाम झाला आहे. दिवाळीसाठी बनवून ठेवलेल्या वस्तूंचा खपच नाही. अशीच स्थिती राहिली तर कुंभार व्यवसाय हळूहळू नामशेष होईल.- दादासाहेब शिरसाठ, कुंभार व्यावसायिक, ममदापूर 

टॅग्स :MarketबाजारDiwaliदिवाळी