शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात जबरी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:40 IST

सटाणा : शहरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चार लाख रु पयांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला. ही घटना शहरातील देवळा रस्त्यावरील शाहूनगर येथे रविवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देचोरट्यांनी लुटला चार लाखांचा सोन्याचा ऐवज

सटाणा : शहरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चार लाख रु पयांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला. ही घटना शहरातील देवळा रस्त्यावरील शाहूनगर येथे रविवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली.शहरातील हॉटेल मोतीमहलनजीकच्या शाहूनगर मधील रिहवाशी विमलबाई भावराव सोनवणे या आपल्या परिवारासह दोन दिवसांपूर्वी लोणी येथे आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या दरम्यान आज सकाळी शेजारी राहणाऱ्या वंदना सोनवणे यांना विमल यांच्या घराचे दार उघडे असल्याचे आढळून आले.या प्रकाराबाबत त्यांनी तत्काळ विमलबाई यांना भ्रमणध्वनीवरून माहिती कळवली .विमलबाई गावाहून परत घरी आल्या असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि लोखंडी कपाट तोडल्याचे आढळून.चोरट्यांनी कपाटातील चार लाख रु पये किंमतीचे पंधरा तोळे सोन्याचा ऐवज लुटून नेल्याचे उघडकीस आले. सटाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी घटनेचे माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पाहणी करून श्वानपथक पाचारण केले.यावेळी श्वानपथकाने देवळा रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला. चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या जबरी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या वाहन संख्येत वाढ करून त्यानुसार गस्तीपथक ठेवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरु द्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड करीत आहेत.(फोटो २४ सटाणा, २४ सटाणा १)सटाणा शहरातील शाहूनगर मधील रिहवाशी विमलबाई सोनवणे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी अस्ताव्यस्त केलेले साहित्ये व कपाटाचे तोडलेले लॉकर दिसत आहे. 

टॅग्स :satna-pcसतनाCrime Newsगुन्हेगारी