शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकविषयक खटले निकाली काढण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:16 IST

नाशिक : लोकसभा, विधानसभा वा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रियेसंबंधी दाखल झालेले गुन्हे व न्यायालयात पाठविलेले खटले ...

नाशिक : लोकसभा, विधानसभा वा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रियेसंबंधी दाखल झालेले गुन्हे व न्यायालयात पाठविलेले खटले तत्काळ निकाली काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले असून, आता अधिकाºयांना अशा खटल्यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मुळात निवडणूकविषयक खटले पोलीस वा संबंधित व्यक्तींच्या अखत्यारित असताना या कायदेशीर बाबीत निवडणूक अधिकाºयांनी कसा हस्तक्षेप करावा, असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे.  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शी व विनावाद पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून काटेकोर तयारी करून घेतली जात असून, आयोगाविषयी मतदारांच्या मनात कोणताही संशय राहू नये यासाठी बारीकसारीक गोष्टींची पूर्तता करून घेतली जात आहे. नवमतदारांची नोंदणी, दुबार नावांची वगळणी, वयाची शंभरी गाठलेले मतदार, तृतीयपंथी मतदार, अपंग मतदार अशांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी दररोज नवनवीन सूचना आयोगाकडून दिल्या जात असून, मतदान केंद्राची तयारी, वीज, पाणी, रॅम्पची सुविधा याबाबत दररोज अधिकाºयांकडून आढावा घेतला जात असताना आता सन २००९ व २०१४ या दोन्ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित किती गुन्हे दाखल झाले आहेत, या गुन्ह्णांची सद्यस्थिती, खटल्यांची सुनावणी आदी माहिती आता आयोगाने सर्व अधिकाºयांकडून मागविली आहे. अशा गुन्हे वा खटल्यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी निपटारा करण्यात यावा, अशा सूचना त्याबरोबर देण्यात आल्या आहेत. अधिकाºयांनी अशा खटल्याची माहिती घेऊन संबंधित न्यायालयाला खटल्यांची लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याची विनंती करावी, प्रसंगी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाºयांनी न्यायालयांना विनंती पत्र लिहावे, असा आग्रह आयोगाने धरला आहे. त्यामुळे सर्व अधिकारी निवडणूक विषयक कामाला लागले असून, निवडणूक खटल्यांची माहिती गोळा केली जात आहे. तथापि, ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बाब असून, अशा प्रकरणात निवडणूक अधिकाºयांचा हस्तक्षेप कायदेशीरदृष्ट्या योग्य होईल काय? असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे. निवडणूक विषयक बहुतांशी खटले पोलिसांकडून दाखल केले जातात किंवा राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करतात. त्यामुळे अशा स्वरूपाच्या खटल्यात थेट निवडणूक अधिकाºयांचा काहीच संबंध येत नाही. परिणामी अशा खटल्यांमध्ये अधिकाºयांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न न्यायालय खपवून घेईल काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक