शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना बंदी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:27 IST

राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण्यात आलेला आहे. परंतु सिनेमागृह चालकाचा आणि खाद्यपदार्थाचा काही एक संबंध नाही

ठळक मुद्देराज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांचे स्पष्टीकरण ७२ तासात अधिकारी तक्रारीची दखल घेऊन निराकरण करतील

नाशिक : सिनेमागृहात बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यावर बंदी नाहीच, परंतु ग्राहकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने व अशी बंदी लादणा-यांना कोणी जाब विचारीत नसल्यामुळे फावते. त्यामुळे सिनेमागृहाचे काम सिनेमा दाखविण्याचे असून, खाद्यपदार्थ बंदी घालण्याचे नाही अशा शब्दात राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी यापुढे जिल्हा पुरवठा विभागाकडे ग्राहकांनी आपल्या तक्रारी कराव्यात असे आवााहनही त्यांनी केले आहे.राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण्यात आलेला आहे. परंतु सिनेमागृह चालकाचा आणि खाद्यपदार्थाचा काही एक संबंध नाही. बाहेरील पाणी व खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी घालून त्यांच्याकडील महागडी वस्तु ग्राहकाच्या माथी मारण्याचाच हा प्रकार असून, यापुढे अशी सक्ती करणा-यांकडे या संदर्भातील परवानग्या आहेत काय याची विचारणा करा असा सल्लाही अरूण देशपांडे यांनी दिला. ग्राहकांचे अधिकार प्रामुख्याने खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेबाबत अधिक आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थाबाबत काहीही तक्रार असेल तर ग्राहकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर करावी ७२ तासात अधिकारी त्याची दखल घेऊन निराकरण करतील असेही सांगितले. ग्राहकांना कोणतीही अडचण आल्यास त्यासाठी थेट न्यायालयात धाव घेण्याची गरज नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घ्यावी. ग्राहकहिताच्या तक्रारींसाठी जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे यापुढे ग्राहकांनी लिखीत स्वरूपात तक्रार करावी. संबंधित खात्याच्या अधिका-यांकडे तक्रारी पाठवून त्याचे निराकरण करण्यात येईल तसेच तालुका पातळीवरील तक्रारीसाठी पुरवठा खात्याच्या नायब तहसिलदारांकडे तक्रारी करता येतील असेही त्यांनी सागिंतले. ग्राहकहितासाठी डिसेंबर महिन्यात राज्यातील ३१० तालुक्यात चारशेहून अधिक ग्राहक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले असून, ग्राहक जागा झाल्यास त्याची फसवणूक होण्याची शक्यताच नसल्याचेही शेवटी अरूण देशपांडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक