शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दाते धावून आल्याने मुखी पडले अन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:20 IST

घरात कर्ता पुरुष नाही, अज्ञान अडाणीपणाबरोबरच घरात अठरा विश्व दारिद्र्य, रस्त्यावर पडलेले कागद काच वेचणे आणि भंगार-वाल्यांना विकल्यानंतर पदरी पडणारे दोन पैसे हेच साधन. मात्र सध्या शहरात संचारबंदी झाली. कचरा वेचायला जाता येत नाही आणि गेले तर कचराच साफ ! अशा बिकट परिस्थतीत चार दिवस घरात चूल पेटली नाही. जठराग्नी फडकल्यानंतर हातपाय मारायला सुरुवात केली. तेव्हा कुठे समाजातील काही दाते धावून आले. त्यांनी धान्य दिले आणि घरात कशा तरी चुली पेटल्या.

ठळक मुद्देकष्टकऱ्यांची उपासमार : सामाजिक बांधीलकीने मिळाली साथ

नाशिक : घरात कर्ता पुरुष नाही, अज्ञान अडाणीपणाबरोबरच घरात अठरा विश्व दारिद्र्य, रस्त्यावर पडलेले कागद काच वेचणे आणि भंगार-वाल्यांना विकल्यानंतर पदरी पडणारे दोन पैसे हेच साधन. मात्र सध्या शहरात संचारबंदी झाली. कचरा वेचायला जाता येत नाही आणि गेले तर कचराच साफ ! अशा बिकट परिस्थतीत चार दिवस घरात चूल पेटली नाही. जठराग्नी फडकल्यानंतर हातपाय मारायला सुरुवात केली. तेव्हा कुठे समाजातील काही दाते धावून आले. त्यांनी धान्य दिले आणि घरात कशा तरी चुली पेटल्या.नाशिक शहरातील सुमारे दीडशे महिलांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. कागद काच वेचणे आणि अप्रत्यक्षरीत्या शहराच्या स्वच्छतेला हातभार लावणाºया अनेक गरीब महिलांपैकी या देखील आहेत. परंतु या महिलांची स्थिती इतरांपेक्षा वेगळी. त्या विधवा किंवा परितक्तया आहेत. निलगीरी बाग, आम्रपाली झोपडपट्टी, भीमवाडी येथे वास्तव्याला असलेल्या महिलांवर संचारबंदीमुळे संक्रांत आली आहे. बाहेर पडायचे नाही तर मग खायचे काय? त्यामुळे पोटासाठी काही तरी करण्यासाठी त्यांनी सेवा केंद्राच्या अ‍ॅड. राजपाल शिंदे यांना साकडे घातले. त्यांनी सोशल मिडीयावरून आवाहन केल्याने मदतीचा ओघ सुरु झाला.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतर्फेही नाशिकरोड, शिखरेवाडी परिसरातील झोपडपट्टी-वासीयांना खाद्य पाकिट पुरविण्यात आले. तर जैन संघटना जितोतर्फेही विविध भागात शिधापुरवठा व अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली.सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि सामाजिक जाणिवेतून काही दाते उभे राहीले. लोकविकास संस्थेचे मिलिंंद व सुजाता बाबर, अमृता गंगाकीरकर अशा अनेकांनी माणुसकी जपली. शक्य तेवढे धान्य दिले. आणि या घरातील महिलांची चूल पेटली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न