शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

जेवणाचा दर्जा योग्य आहे काय?  समाजकल्याण आयुक्तांचा थेट मुलींशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:12 IST

आपल्यापैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का? अभ्यासिका चांगली आहे का? इंटरनेट सुविधा आहे का? जेवण चांगले आहे का? स्वच्छता चांगली आहे का? परिसर कसा आहे? असल्या प्रकारच्या एकामागोमाग एक असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे मुलींशी शनिवारी सकाळी राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थिनींनीही पटापट उत्तरे देत त्यांचे समाधान केले.

नाशिक : आपल्यापैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का? अभ्यासिका चांगली आहे का? इंटरनेट सुविधा आहे का? जेवण चांगले आहे का? स्वच्छता चांगली आहे का? परिसर कसा आहे? असल्या प्रकारच्या एकामागोमाग एक असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे मुलींशी शनिवारी सकाळी राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थिनींनीही पटापट उत्तरे देत त्यांचे समाधान केले.  राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरीलमुलींच्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी शंभरकर यांनी थेट मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधताना त्यांना मिळणाया सुखसोयींबरोबरच शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच भवितव्याबाबत चर्चा केली. यावेळी प्रादेशिक उपआयुक्त राजेंद्र कलाल, विशेष अधिकारी देवीदास नांदगावकर, गृहप्रमुख सरिता रेड्डी, सविता गवारे, नंदा रायते व सुभाष फड आदी उपस्थित होते.  यावेळी आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शासकीय वसतिगृहाचा फेरफटका मारला.  मुलींच्या निवास रूममधील सुविधांची पाहणी करून वसतिगृहाच्या स्वच्छतेबाबत उपस्थित गृहप्रमुखांना सूचना दिल्या.समस्या जाणून घेतल्यायावेळी शंभरकर यांनी मुलींना आपली नियमित आरोग्य तपासणी होते? हिमोग्लोबीन तपासणी केव्हा झाली? वसतिगृहाच्या वेळापत्रकात आरोग्य तपासणी समाविष्ट असते? असे प्रश्न विचारून त्यांनी मुलींच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहातील आहार पुरेसा आहे का? आपणास नास्त्यात दूध, अंडी, फळे नियमित भेटतात का ? संगणक रूममध्ये इंटरनेट सुविधा आहे का? अभ्यासिकेत पुस्तके आहेत का ? आपण स्पर्धा परीक्षा पुस्तके वापरता का ? अशाप्रकारे संवाद साधत आयुक्तांनी उपस्थित विद्यार्थिनींना परीक्षांच्या शुभेच्छा दिल्या.

 

टॅग्स :Nashikनाशिक