शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खरीपा पाठोपाठ आता रब्बीतही मका लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:02 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप मकाचे पीक घेतले जाते, तसेच मका बरोबर कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती पण मोठ्या प्रमाणात कांदा रोपे बुरशीजन्य रोगाने जमिनीतच सडल्याने व आता टाकलेली लाल, उन्हाळ कांदा रोपे मुसळधार पावसाने झोडपले व पुढे रोपांची शाश्वती नसल्याने शेतकरी खरिपा पाठोपाठ रब्बीतही मका लागवड करत असून ,मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप मकाचे पीक घेतले जाते, तसेच मका बरोबर कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती पण मोठ्या प्रमाणात कांदा रोपे बुरशीजन्य रोगाने जमिनीतच सडल्याने व आता टाकलेली लाल, उन्हाळ कांदा रोपे मुसळधार पावसाने झोडपले व पुढे रोपांची शाश्वती नसल्याने शेतकरी खरिपा पाठोपाठ रब्बीतही मका लागवड करत असून ,मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारण रब्बी हंगमात हरभरा , गहु, कांदा पिकाबरोबर आता मका पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आता उन्हाळी मका पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे,कारण पुर्वी शेतकरी खरीपातील मका पीक घेतल्यानंतर रब्बीतील उन्हाळी मका घेत नव्हते ,पण आता मागील वर्षांच्या अनुभवावरून रब्बीतही मका पीक चांगल्याप्रकारे येत असल्याने मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे .

यावर्षी खरिपातील मकाला लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मका पिकाला औषधांचा खर्च कमी प्रमाणात येऊन मका पीक चांगले आले होते , या वर्षी बुरशीजन्य रोग व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात लाल,उन्हाळ कांदा रोपांची नुकसान झाल्याने व कांदा बियाण्या़चा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीतही उन्हाळी मका घेण्याचा पर्याय शोधल्याने शेतकऱ्यांना जनावरांना चारा उपलब्ध होऊन मकाचेही उत्पादन मिळणार आहे.मुरघासाला मागणीमागील वर्षी कांदा रोपे नसल्याने व गगनाला भिडलेल्या रोपांच्या भावामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका लागवड केली या मका लागवडीतून शेतकऱ्यांना मका पिकाच्या उत्पादनाबरोबर मुरघासासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी राहिल्याने शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळाले.मी लाल व उन्हाळ कांद्यासाठी क्षेत्र ठेवले होते पण बुरशीजन्य रोगाने व परतीच्या पावसाने लाल, उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने व बियानेचाही तुटवडा भासत असल्याने उन्हाळी मकाचा प्रयोग करून पाहिला.- कोंडाजी शिंदे जळगाव नेऊर.ता . येवला 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती