लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या तीन वर्षांच्या कालावधीत नागरिकांसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी देशभरातील तीनशे जिल्ह्यांमध्ये तीनदिवसीय ‘मोदी फेस्ट’चे आयोजन केले आहे़ शहरातील गंगाघाटावर सुरू असलेल्या या मोदी फेस्टमध्ये वयोवृद्ध नागरिकांची पेन्शन समस्या, पंतप्रधान आवास योजना तसेच गॅस सिलिंडर अनुदान आणि महापालिकेच्या बाबुगिरीच्या सर्वाधिक तक्रारी केल्या आहेत़ भाजपा सरकारने नागरिकांसाठी विविध प्रकारच्या ९२ योजना सुरू केल्या आहेत खऱ्या, मात्र या योजनांबाबत जनसामान्यांना माहितीच नाही़ यामुळे या योजनांचा प्रचार, प्रसार तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन करण्यासाठी मोदी फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे़ पोस्टकार्डवर तक्रारीकेंद्र शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्याचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या़ या तक्रारी पोस्टकार्डवर लिहून घेतल्या जात होत्या़ तक्रारींचे पोस्ट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन या स्वयंसेवकांनी दिले़
‘मोदी फेस्ट’मध्ये वाचला तक्रारींचा पाढा़
By admin | Updated: June 12, 2017 01:07 IST