शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी परिसरात चारा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 23:00 IST

सिन्नर /पांगरी : सिन्नर-शिर्डी महामार्गालगत पांगरी शिवारात जनावरांसाठी शेतात साठवून ठेवलेला सुमारे १२ ट्रॅक्टर ज्वारी व मक्याचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सदर शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

सिन्नर /पांगरी : सिन्नर-शिर्डी महामार्गालगत पांगरी शिवारात जनावरांसाठी शेतात साठवून ठेवलेला सुमारे १२ ट्रॅक्टर ज्वारी व मक्याचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सदर शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.वावी-पांगरीदरम्यान शिंंदे वस्तीजवळ आनंदा देवराम पांगारकर यांची वस्ती आहे. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पांगारकर यांच्या घरामागे असलेल्या चाºयाच्या गंजीतून धूर निघत असल्याचे बाजूच्या वस्तीवरील शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी लागलीच पांगारकर कुटुंबांना निरोप देत आजूबाजूच्या शेतकºयांनाही मदतीसाठी आरडाओरड करून बोलावले. वाळलेल्या चाºयाच्या गंजीने पेट घेतल्याने क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला. जवळपास कुठेही पाण्याची सोय नसल्याने पांगारकर यांनी पांगरीचे सरपंच ज्ञानेश्वर पांगरकर यांच्यामार्फत सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला सुचित केले. मात्र, नगरपालिकेचा मोठा बंब नादुरुस्त असल्याने लहान बंब पाठवण्यात आला. रात्री १ वाजेच्यासुमारास पोहोचलेल्या या बंबानेआग विझवली. मात्र, आग धुमसतच होती.वावी पोलिसांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला असून यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तर सरपंच पांगारकर यांचे उपस्थितीत तलाठ्यांनी देखील नुकसानीचा पंचनामा केला आहे. पांगारकर यांचा शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. आगामी काळात चाºयाची तजवीज म्हणून त्यांनी बाहेरून विकत घेऊन हा चारा साठवून ठेवला होता. मात्र आगीने होत्याचे नव्हते केल्याने त्यांना मोठ्या टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.--------शेतकºयाला आर्थिक फटकाबंबातील पाणी संपल्याने व वीजपुरवठा बंद असल्याने पाण्याचा बंब पुन्हा भरण्याची सोय झाली नाही. परिणामी अग्निशमन दलाचे जवान माघारी परतले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास वावीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे घटनास्थळी आले असता चाºयाच्या गंजीतून धुमसणारी आग पाहून त्यांनी पुन्हा नगरपालिका बंबास पाचारण केले. त्यानंतर आलेल्या मोठ्या बंबाने आग पूर्णत: विझवली. मात्र तोपर्यंत सर्व चारा खाक झाला होता. पांगारकर यांनी जनावरांसाठी सहा ट्रॅक्टर कडबा, सहा ट्रॅक्टर चारा साठवून ठेवला होता. तर सहा ट्रॅक्टर मक्याच्या बिट्या (कणसे) साठवल्या होत्या. आगीने हा संपूर्ण चारा भस्मसात केला. या आगीत शेजारी असणारे पीव्हीसी पाईप, शेतोपयोगाची लाकडी औजारेदेखील जळून खाक झाली.

टॅग्स :Nashikनाशिक