बर्ल्ड फ्लूवर २८ टीमच्या माध्यमातून लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:41+5:302021-01-16T04:18:41+5:30

नाशिक: जिल्ह्यात काही ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अहवाल प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. अद्याप त्यांचे अहवाल प्राप्त झालेले ...

Focus on world flu through 28 teams | बर्ल्ड फ्लूवर २८ टीमच्या माध्यमातून लक्ष

बर्ल्ड फ्लूवर २८ टीमच्या माध्यमातून लक्ष

Next

नाशिक: जिल्ह्यात काही ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अहवाल प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. अद्याप त्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. मात्र, जिल्ह्यात बर्ल्ड फ्लूचा संसर्ग झाला नसल्याचे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात १५४० पोल्ट्रीफार्म असून, राज्यात ही सर्वात मोठी संख्या आहे. अफवांमुळे या व्यवसायावर परिणाम होत असल्याने, अशा अफवा पसरवू नयेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सुरगाणा, इगतपुरी, येथे काही ठिकाणी कावळे, भारद्वाज या पक्ष्यांसह अन्य पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या पक्ष्यांचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, जिल्ह्यात बर्ल्ड फ्लूबाबतची अद्याप प्रकरण समोर आलेले नाही. नाशिक जिल्ह्यात १,४५० पोल्ट्री फार्म नाशिक जिल्ह्यात असून, बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे. या संदर्भात नुकतीच एक आढावा बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये आरेाग्य विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील सुमारे दीड हजार पोल्ट्री फार्म असून, त्यामध्ये ४५ लाख इतके पक्षी आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेतली जात असून, दक्षतेच्या सूचना पोल्ट्री व्यावसायिकांनाही देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची अद्याप एकही केस नसून, याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यासाठी २८ टीम गठीत करण्यात आली असून, हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात येत आहे. कुठेही कुणालाही पक्षी मृतावस्थेत आढळून आला, तर तत्काळ हेल्पलाइन किंवा पशुसंवर्धन रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

इगतपुरी तालुक्यात पोल्ट्री फर्ममध्ये कोंबड्या मृत पडल्या. या प्रकरणी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तलयाकडून अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूने एकाही पक्ष्याचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Focus on world flu through 28 teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.