शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

फरशी पूल बनले धोकेदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:23 IST

कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.

कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने मजबूत पुलाची शास्रशुद्ध पद्धतीने बांधणी केली. मात्र पूरपाण्याच्या प्रवाहामुळे पुलासाठी टाकण्यात आलेला भराव व पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.चणकापूर परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना कसरत करत वाट काढावी लागत आहे. चणकापूर भागातून कनाशी भागात जाण्यासाठी अभोणामार्गे अधिक अंतर पडत असल्यामुळे कमी वेळात व कमी अंतरात कनाशी गाठण्यासाठी धरणाखालील रस्ता हा जवळचा आहे. त्यामुळे पुलावरील वर्दळ वाढली होती. शिवाय चणकापूर येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक अर्जुनसागर (पुनंद), भेगू, सापुतारा येथे जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. चणकापूर धरणातून आवर्तन सोडल्यानंतर परिसरातील पर्यटक चणकापूर धबधबा परिसरात गर्दी करतात. या धबधब्यावर जाण्यासाठी पुलाचा मार्ग सोयीस्कर ठरतो. एकदिवसीय सहलीसाठी तालुक्यातील पर्यटकांची पहिली पसंती चणकापूर असते. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर पावसाळ्यात व धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर निर्माण होणाऱ्या धबधब्यामुळे आकर्षणाचे केंद्र ठरतो.तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाणी सोडल्याने धबधब्यांचे सौंदर्य जवळून न्याहाळता येते. कनाशीकडून येणाºया रस्त्यावर घनदाट वृक्षराई पर्यटकांना नेहमीच खुणावत असते.उन्हाळ्यात येथे चौपाटी व वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे धरणाखालील पूल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मात्र सद्य:स्थितीत परिसरातील गिरणा नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्याने व पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक