शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

नद्यांना पूर

By admin | Updated: July 10, 2016 22:53 IST

नद्यांना पूर

 नाशिक : शहरासह परिसरात शनिवारी सकाळपासून झालेल्या संततधारेने गोदावरीसह वाघाडी, नासर्डी व दारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, या नद्यांच्या काठावरील झोपडपट्टीधारक तसेच रहिवाशांना सावधानतेचा इशारा म्हणून तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुख्य रस्त्यांवर उघड्यावर बसणारे व्यावसायिक तसेच विविध चौकांमध्ये व रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना त्याचा फटका बसला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांचीही अडचण झाली. मोकळे भूखंड झाले जलमयपंचवटी परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहने अडकून पडली होती. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या काही टपऱ्या वाहून गेल्या. शनिवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारीही कायम असल्याने याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकांना बसला आहे. तसेच रामकुंड परिसरात नदीकाठी असलेल्या काही दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पावसामुळे मुख्य रस्ते तसेच मोकळे भूखंड जलमय झाले. या संततधारेमुळे वाघाडी नाला व गोदावरीला पूर आल्याने नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी केली होती.कॉलनी रस्त्यांची लागली वाटगंगापूररोड परिसरातील विविध कॉलनी परिसरात पाणी साचल्याचे चित्र होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक चेंबर्स क्षमतेपेक्षा अधिक वाहत होते. अनेक ठिकाणी चेंबरमधील मैलायुक्त पाणी बाहेर पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गंगापूररोडप्रमाणेच सातपूर, कामटवाडे परिसरातही अंतर्गत कॉलनी रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. कामटवाडे परिसरातील अंबिकानगर परिसरातही गुडघाभर पाणी साचले असून, या परिसरातील लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागाकडे पाठ फिरवली असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात नवीन रस्तेदेखील बांधण्यात आले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी भूमिगत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम झाले असले तरी या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांनी या परिसरात अधिकच चिखल झाला असून, गाडी स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी चिखल तसेच साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वृत्तपत्रविक्रेता घसरून पडण्याची घटना घडली आहे. या सखल भागात तब्बल गुडघाभर पाणी असल्याने पायी चालणे मुश्किल झाले असून, दुचाकी वाहनांच्या इंजिनमध्येही पाणी जाऊन ही वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल होत असून, तातडीने तात्पुरत्या स्वरूपात का होईना रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.जागोजागी पाणी तुंबले नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प भागात भूमिगत गटारींमध्ये कचरा अडकल्याने सर्वत्र पावसाचे पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिकांनी फावडे, कुदळ आदि सामान घेऊन चेंबरचे झाकण उघडे करण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर व काही सखल भागात घरे व झोपड्यांत पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नाशिकरोड भागात रविवारी दिवसभर व सायंकाळी विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे सर्व अंधाराचे साम्राज्य होते. कंपन्यांसमोर गुडघाभर पाणी सातपूरच्या त्रंबकरोडवर पपया नर्सरी, अंबड-सातपूर लिंकरोडवर आझाद चौक, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा सर्कल, मायको सर्कल कंपनीसमोर गुडघाभर पाणी साचले होते. तसेच एबीबी सर्कल, श्रीराम चौक, सातपूर कॉलनी भागात अनेक चौकात पाणी साचल्याने रस्ते जलमय होऊन वाहतूक खोळंबली होती. नासर्डी नाल्याला पूर आल्याने आयटीआयनजीकच्या झोपड्या पाण्याखाली गेल्या होत्या. सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगर, आनंदवली, नवश्या गणपती आदि ठिकाणच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. काही ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत पुरवली. नासर्डी नदीला पूर आल्याने नदीच्या किनाऱ्यावरील रहिवाशांना फटका बसला. नदीकाठावरील झोपडपट्टीवासीयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. नदीला पूर आल्याने काठावरील राहिवाशांची धावपळ उडाली (लोकमत चमू)