शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

लॉकडाऊन झुगारून गर्दीचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:25 IST

पिंपळगाव बसवंत : नागरिकांच्या सोयीसाठी लॉकडाऊनच्या काळात काही अटी शिथिल करून व्यवहार सामान्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉकडाऊनमधील नियम झुगारून पिंपळगाव बसवंत परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी गर्दीचा रोजच महापूर दिसू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पिंपळगाव बसवंत : नागरिकांच्या सोयीसाठी लॉकडाऊनच्या काळात काही अटी शिथिल करून व्यवहार सामान्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉकडाऊनमधील नियम झुगारून पिंपळगाव बसवंत परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी गर्दीचा रोजच महापूर दिसू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील मुख्य परिसर निफाड फाटा, मेन रोड, शिवाजी शॉपिंग सेंटर, स्टेट बँक, यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटर, चिंचखेड रोड परिसर, बँक आॅफ इंडिया आदी भागात किराणा माल खरेदी व इतर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी चहूबाजूने नागरिक हजारोंच्या संख्येने येत असतात. या ठिकाणी जी वस्तू किंवा माल विकला जातो तो शहराच्या इतरही भागात सहज मिळतो मात्र अनेकांना निफाड फाटा, मेनरोड येथूनच माल खरेदी करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे रोज किमान दोन ते तीन हजार ग्राहकांची गर्दी दर तासाला या परिसरात झालेली दिसते. या ग्राहकांसोबत त्यांच्या वाहनांचीही कोंडी होत असते. लॉकडाऊन काळात काही नियम शिथिल केले असले तरी सर्वच नियम झुगारून नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. पोलीस स्थानकापासून निफाड फाटा, शिवाजी शॉपिंग सेंटरपासून जुना आग्रा रोड, मेनरोड, स्टेट बँक या परिसरात फेरफटका मारला तर शहरातील लॉकडाऊन मागे घेतला की काय अशी अवस्था पाहायला मिळत आहे.एका ठिकाणी एकाच प्रकारची पाच दुकाने ही जवळजवळ व त्या परिसरात असतील तर त्या ठिकाणी अशी दुकाने उघडण्यास परवानगी देऊ नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आदेश दिले असले तरी ही सर्व दुकाने सुरू असून फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पूर्णपणे बोजवारा उघडलेला आहे. कित्येक जण तोंडावर मास्क किंवा हॅन्ड ग्लोज वापरत नाही. एकाला झालेला कोरोना गर्दीला बाधित करेल याचीही भिती नागरिकांना वाटेनाशी झाली आहे.चौकट....पोलीस प्रशासन हतबल.....लॉक डाऊनच्या काळात पोलीस आक्र मक होऊन नागरिकांना शिस्त लावत होते मात्र त्या विरोधातही ही आरडाओरड सुरू झाल्याने सध्या पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत पोलिस या नागरिकांना कोणत्याही सूचना देताना दिसत नाही. सायंकाळी ६ नंतर मात्र पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखत आहेत. मात्र गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगबाबत पोलिस यंत्रणाही हतबल झाली असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक