शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या प्रवाहाचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:22 IST

वणी : लेंडी नाल्याला येणाऱ्या पूरपाण्याच्या प्रवाहासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून लाखो रुपयांची हानी झाली होती.

वणी : लेंडी नाल्याला येणाऱ्या पूरपाण्याच्या प्रवाहासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून लाखो रुपयांची हानी झाली होती. रहिवाशांचा जीव टांगणीला लागल्याने त्यांना रात्र जागून काढावी लागली. जगदंबा देवी मंदिर परिसरात पावसाळ्यात येणाºया पुरामुळे या भागातील रहिवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन ग्रामपालिकेने छोटेखानी पूल उभारून पाणी प्रवाहित होऊन पुढे जाईल, असे नियोजन केले होते. मात्र मागील वर्षी पावसाने थैमान घातले. पुलाची उंची वाढवूनही पुराचे पाणी रस्त्यावर, रहिवाशांसह दुकानांमध्ये शिरल्याने मोठी आर्थिक हानी झाली होती.सप्तशृंगगडावरील पर्वतरांगा व मार्कंडेय पर्वताच्या तळालगत असलेल्या भागाचे पाणी भातोडा येथील नदीत येते व ते लेंडी नाल्यात येते. गड परिसरात जोराचा पाऊस झाला की लेंडी नाल्याला पूर येतो हे समीकरण आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पूरपाणी वाहून जाण्यासाठी मोकळ्या प्रवाहाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी ते पुरेसे व्हावेत, अशी अपेक्षा या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.----------------गावातील बहुतांशी पावसाचे पाणी लेंडी नाल्याला जाऊन मिळते. या पाण्याच्या प्रवाहाला अवरोध होणार नाही, तसेच पाणी रस्त्यावर साचणार नाही याकडेही अग्रक्र म देणे आवश्यक आहे. सध्या जैन मंदिर ते जगदंबा मंदिर परिसरापर्यंत रस्त्याचे काम ग्रामपालिकेने हाती घेतले आहे. मात्र प्रथम या कामाला या भागातील रहिवाशांनी विरोध केला. गावातील बहुतांशी पावसाचे पाणी लेंडी नाल्याला जाऊन मिळते. या पाण्याच्या प्रवाहाला अवरोध होणार नाही, तसेच पाणी रस्त्यावर साचणार नाही याकडेही अग्रक्र म देणे आवश्यक आहे. सध्या जैन मंदिर ते जगदंबा मंदिर परिसरापर्यंत रस्त्याचे काम ग्रामपालिकेने हाती घेतले आहे. मात्र प्रथम या कामाला या भागातील रहिवाशांनी विरोध केला.

टॅग्स :Nashikनाशिक