लोहोणेर : गेल्या आठवड्यात पडलेल्या संततधार पावसामुळे कळवण, सुरगाणा तालुक्यातील नद्यांना प्रचंड पूर आल्याने गिरणा काठावरील शेतीचे नुकसान होऊन नदीकाठालगतचे उभे पीक वाहून गेले. देवळा तालुक्यातील विठेवाडी,भऊर, सावकी, खामखेडा, लोहोणेर या गावांतील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.विठेवाडी - सावकी गावादरम्यान गिरणा नदीवर असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन बंधाºयाला दोन-तीन ठिकाणी भगदाड पडून तो फुटला. या पुराच्या पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणकडे धावल्याने व पाण्याच्या अतिदाबाने बंधाºयाचा काही भाग तुटला. त्यामुळे दक्षिण काठावर असलेल्या विठेवाडी येथील फुला जाधव व मोठाभाउ जाधव यांच्या शेतात (गट नं ५६८) पुराचे पाणी घुसून जवळपास २०० फुटांपर्यंत नदीकाठचा भराव व धक्का कापला गेला. तसेच काठावरील झाडे वाहून गेली व शेतांमधील मका, ऊस या पिकांचे नुकसान झाले. पुरामुळे काही प्रमाणात हानी झालेल्या जुन्या बंधाºयाची त्वरित दुरूस्ती करावी , अशी मागणी आहे. जलसिंचन व महसूल विभागाने त्वरीत सर्वेक्षण करून पुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी,तसेच बंधाºया लगत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
लोहोणेर परिसरातील पिकांचे पुरामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:19 IST
गेल्या आठवड्यात पडलेल्या संततधार पावसामुळे कळवण, सुरगाणा तालुक्यातील नद्यांना प्रचंड पूर आल्याने गिरणा काठावरील शेतीचे नुकसान होऊन नदीकाठालगतचे उभे पीक वाहून गेले. देवळा तालुक्यातील विठेवाडी,भऊर, सावकी, खामखेडा, लोहोणेर या गावांतील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
लोहोणेर परिसरातील पिकांचे पुरामुळे नुकसान
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पंचनाम्यांसह भरपाई देण्याची मागणी