शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नाशिकमधून थेट दिल्लीपर्यंत हवी विमानसेवा

By admin | Updated: April 21, 2017 01:22 IST

नाशिक : ओझर येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यास थेट दिल्लीपर्यंत सेवा असावी, असे नाशिककरांचे मत असून ३४.३ टक्के नागरिकांनी तसा कौल दिला आहे

 नाशिक : ओझर येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यास थेट दिल्लीपर्यंत सेवा असावी, असे नाशिककरांचे मत असून ३४.३ टक्के नागरिकांनी तसा कौल दिला आहे तर बेंगळुरू आणि गोवा त्यानंतरची पसंती ठरली आहे. हॉपिंग फ्लाइटसाठी मात्र मुंबईमार्गे जाण्यासाठी सुमारे साठ ते सत्तर टक्के नागरिकांनी मान्यता दिली आहे.ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक असून, त्यांनी नाशिककरांचा पसंतीक्रम कसा राहील याबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले. त्यांना मदत म्हणून नाशिकमधील काही उद्योजक आणि अन्य नागरिकांनी फेसबुक सर्व्हे सुरू केला आणि त्यानुसार विहित लिंकवर आपले मत नोंदविले आहे. गुरुवारपर्यंत दहा हजार ५०० नागरिकांनी या लिंकवर मत नोंदविले असून, त्यापैकी ३४.३ टक्के नागरिकांनी नाशिकहून थेट दिल्लीपर्यंत विमानसेवा असावी, असे मत व्यक्त केले आहे. २७.१ टक्के नागरिकांनी बेंगळुरूपर्यंत सेवा असावी, असे मत व्यक्त केले आहे. हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबादचा क्रमांक त्यानंतर लागतो. हैदराबादपर्यंत थेट सेवा सुरू व्हावी असे मत १२.४ टक्के तर चेन्नई आणि अहमदाबादसाठी केवळ ३.९ टक्के नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. सर्वात कमी म्हणजे २.९ टक्के नागरिकांनी कोलकाता येथे सेवा सुरू करावी, असे मत व्यक्त केले आहे.नाशिकहून हॉपिंग फ्लाइट सुरू करायचे ठरल्यास मुंबई मार्गेच ही सेवा असावी यामतावर ७० टक्क्यांहून अधिक नागरिक ठाम आहेत. त्यामुळे थेट नाशिक मुंबई सेवेपेक्षा मुंबईमार्गे अन्यत्र जाण्यासाठी विमानसेवा असावी असा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती उद्योजक मनीष कोठारी यांनी दिली. (प्रतिनिधी)