मालेगाव : शहरातील बारा बंगला भागात दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातून ६० हजार रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची कंठीमाळ चोरून नेली. शांतीबेन जमनादास दत्ताणी (८५), रा. बाराबंगला यांनी छावणी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आज सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शांतीबेन दत्ताणी या कॅम्पातील दत्त मंदिरातून दर्शन घेऊन घरी येत असताना बाराबंगला भागात त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर अनोळखी इसमाने त्यांना धक्का देऊन खाली पाडले.
चेन ओढून चोरटे फरार
By admin | Updated: July 29, 2016 00:31 IST