शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मोसम खोऱ्यातील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:15 IST

निकृष्ट दर्जा, उखडलेले डांबर, उघडी पडलेली खडी अन् नामशेष झालेल्या साइडपट्ट्या अशी अवस्था बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह मोसम खोºयात गेल्या अनेक वर्षांपासून गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे खेड्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

शरद भामरे।स्थळ : मुळाणे-कौतिकपाडा रस्ता. वेळ : सकाळी १० वा.औंदाणे : निकृष्ट दर्जा, उखडलेले डांबर, उघडी पडलेली खडी अन् नामशेष झालेल्या साइडपट्ट्या अशी अवस्था बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह मोसम खोºयात गेल्या अनेक वर्षांपासून गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे खेड्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मुळाणे ते कौतिकपाडा सुमारे तीन किलोमीटर रस्त्यावरील डांबर उखडले आहे. खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहेत व दुतर्फा काटेरी बाभळांनी वेढा घातल्याने साइडपट्ट्या नामशेष झाल्या आहेत. शेतकºयांनी रस्त्यालगत पिके घेतल्याने रस्ता छोटा होऊन रस्ता की पांधी अशी अवस्था आहे. तादुंळवाडी ते नांदीनकडे जाणाºया तीन कि.मी. रस्त्याचे हाल झाले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण नाही की निधीही मंजूर नाही. कच्चा रस्ता असल्याने खडी पूर्णत: उघडी पडली आहे. नांदीन ते पिसोळ किल्ला हा सुमारे दोन कि.मी. रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. खडी उघडी पडली आहे. हा रस्त्यावर पुरातन पिसोळ किल्ला असून, पर्यटकांची येथे वर्दळ असते. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.   तालुक्यातील काही भागात दोन-दोन, तीन-तीन कि.मी. अंतराचे रस्ते झाले आहेत. मात्र निकृष्ट दर्जामुळे दोनच वर्षांत डांबर उघडून रस्त्याची दुरवस्था झाली. उर्वरित रस्त्यांना निधी उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने हे रस्ते जैसे थे आहेत. हे सर्वच रस्ते वर्दळीचे आहेत. स्थानिक नागरिक व शेतकरी याच मार्गांवरून सटाणा व कळवण येथे शेतमाल नेतात. मात्र रस्ते ठिकठिकाणी उखडल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते.  रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांनी अतिक्रमण केले आहे.त्यामुळे साइडपट्ट्या नामशेष झाल्या आहेत. झुडपांच्या अतिक्रमणामुळे वळणावर वाहने एकमेकांना न दिसल्यामुळे लहान -मोठे अपघात घडत आहेत. खराब रस्त्यामुळे शेतकरी वर्गाला आपला माल वेळेवर बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र या सर्व गोष्टींचा सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीवर कुठलाही परिणाम होत नाही. या रस्त्यांवरु न पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय नसल्याने हे पाणी साचून ठिकठिकाणी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे वाहनधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ता उखडून खडी वर आल्याने वाहने घसरणे, पंक्चर होणे, वाहनांचे पाटे तुटणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. लोकांना मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.वाहनधारकांचे हालजुनी शेमळी ते अजमीर सौंदाणे हा तीन किमी रस्ता छोट्या मोठ्या डोंगर पायथ्यापासून गेला आहे. या रस्त्याला निधी नसून लोकप्रति निधीही कधी ही इकडे फिरकले नसल्याने वाहनधारकांना खडी तुडवत धूळ अंगावर झेलत मार्गक्रमण करावे लागते. आदिवासी भागातील दूरवर मोरकुरे ते पठावे या चार किलोमीटर रस्त्याचे डांबर वर्षात उघडून गेले आहे. खडी उघडी पडल्याने वाहने पंक्चर होत आहेत. खड्ड्यांच्या प्रमाण वाढ झाली आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे वाहने नादुरुस्त होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. चालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा