शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:46 IST

कॉँग्रेस, शिवसेना, राष्टवादी व भाजपा असा चौफेर राजकीय प्रवास करीत असताना आणि त्यातून अनेक मित्र जोपासतांनाच राजकीय वैमनस्यही ओढवून घेणाऱ्या हिरे कुटुंबीयांना पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांची राजकीय घुसमट ओळखून रोज बहुविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या ‘सदिच्छा’ भेटी घेणे चालविले असून, याद्वारे एकमेकांचे राजकीय वजन वाढवून घेण्याचा प्रयत्न होत आहे.

नाशिक : कॉँग्रेस, शिवसेना, राष्टवादी व भाजपा असा चौफेर राजकीय प्रवास करीत असताना आणि त्यातून अनेक मित्र जोपासतांनाच राजकीय वैमनस्यही ओढवून घेणाऱ्या हिरे कुटुंबीयांना पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांची राजकीय घुसमट ओळखून रोज बहुविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या ‘सदिच्छा’ भेटी घेणे चालविले असून, याद्वारे एकमेकांचे राजकीय वजन वाढवून घेण्याचा प्रयत्न होत आहे. याच क्रमात शुक्रवारी सांयकाळी हिरे कुटुंबीयांच्या उंबºयात भुजबळ कुटुंबीयांच्या सदस्याने स्वत:हून हजेरी लावल्याने त्याची राजकीय चर्चा घडली नसती तर ते नवलच ठरले असते. एकेकाळी एकमेकांना राजकीय आखाड्यात पाहून घेण्यासाठी शड्डू ठोकून बाह्या सरसावणाºयांना ‘झाले गेले गंगेला मिळाले’असे म्हणण्याची वेळ का यावी याचीही त्यानिमित्ताने चर्चा होणे साहजिकच आहे.  जिल्ह्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. सत्ताधाºयांची ताकद गेल्या चार वर्षांत जितकी वाढली तितकीच नाराजीही कायम आहे. आजचे विरोधक ज्यावेळी सत्ताधारी होते, त्यावेळी यापेक्षा वेगळी परिस्थिती नसली तरी, त्याचा गवगवा मात्र खूप झाला होता. जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व ओघानेच आलेल्या गुन्हेगारी घटनेलादेखील भुजबळ हेच जबाबदार असल्याचे चित्र रंगविण्यात भुजबळांचे विरोधक त्याकाळी जसे पुढे होते, तसेच स्वपक्षीयदेखील त्याचे भांडवल करण्यात अग्रभागी होते. त्याचाच फटका २०१४ च्या लोकसभेत बसला व खुद्द छगन भुजबळ यांनाच राजकीय विजनवास पत्करावा लागला.भुजबळांचे जिल्ह्यातील जे जे विरोधक म्हणून गणले गेले त्यात हिरे कुटुंबीयदेखील मागे नव्हते. अशातच भुजबळ यांची सद्दी संपविण्यासाठी प्रशांत हिरे यांच्या धाकल्या पुत्राने थेट समोरा समोर येऊन दोन हात करण्याचे आव्हान देऊन राजकीय वर्तुळात टाळ्या मिळविल्या होत्या. त्यामुळे भुजबळ व हिरे यांच्यातील वाद जिल्ह्यातील राजकारणात जाहीरपणे उफाळून आला होता. आता चार, साडेचार वर्षांत भुजबळांना त्यांची संपलेली सद्दी जशी परत मिळविण्याची गरज निर्माण झाली, तशीच ती हिरे कुटुंबीयांचीदेखील निकड बनली आहे.कॉँग्रेसचा वारसा सांगणाºया या कुटुंबीयांनी सत्तेच्या काळात सेनेचे धनुष्य पेलले, त्यानंतर सत्तांतरात राष्टÑवादीचे घड्याळ हातात बांधले, भाजपाचा सर्वत्र बोलबाला झाल्यानंतर ते कमळाच्या पाठीमागे धावले परंतु आता मात्र त्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी त्यांना ‘जुनं ते सोनं’ असे वाटू लागल्याने त्यांनी वरच्यावर अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्या भेटी घेऊन राष्टÑवादी प्रवेशासाठी अधिरता दाखविल्याचेही दिसून आले.परंतु भुजबळ यांच्या तुरुंगातील सुटकेमुळे तो प्रवेश रोखला गेल्याची चर्चा होत आहे. आॅगस्टमध्ये होणाºया त्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी पक्षश्रेष्ठी राजी होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या हिरे यांच्यासाठी नाशिकच्या दौºयावर येणाºया सर्वपक्षियांनी त्र्यंबकरोडवरील ‘मधुर मुरली’ भोवती रुंजी घालताना दिसून आले. हे करताना त्यातील राजकीय हेतू लपून राहिला नाही. ज्या राष्टÑवादीसाठी आतूर झालो, त्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अन्य राजकीय पर्याय खुले असल्याचे चित्र हिरेंनी निर्माण करण्यात यश मिळविले. नेमकी त्यांची हीच खेळी लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या भुजबळ कुटुंबीयांना धोक्याची वाटली असावी, त्यामुळेच की काय एरव्ही भुजबळांसमोर हिरेंचे व हिरेंसमोर भुजबळ यांचे नाव घेण्यावर कडक निर्बंध असतानाही समीर भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करून विसरही पडलेल्या प्रशांत हिरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारच्या तिन्ही सांजेची वेळ निवडली. हाती भला मोठा पुष्पगुच्छ देऊन हिरे कुटुंबीयांच्या पुढील वाटचालीस त्यांनी जशा शुभेच्छा दिल्या, तशाच त्या हिरेंकडून भुजबळ कुटुंबीयांच्याही पदरात पाडून घेतल्या.दोन्ही कुटुंबीयांनी दीड दशकातील राजकीय वैमनस्य विसरून एकमेकांची सुख-दु:खे जाणून घेताना आपापली राजकीय सोयदेखील यानिमित्ताने पाहून घेत, त्यातील अडचणींवर चर्चा केली. आता या राजकीय भेटीची चर्चा जो तो आपापल्यापरीने करण्यास मोकळा असला तरी, हिरे-भुजबळ यांनीही स्वत:ची सोय या भेटीच्या निमित्ताने करून घेतली आहे. या भेटीसाठी नेमका कोणाचा पुढाकार होता हे मात्र गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :Prashant Hireप्रशांत हिरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण