मनमाड: येथील नांदगाव रोडवरील बुरकुल वाडी भागातील एन आर फ्लोअर मिल या रवा व मैदा तयार करणाº्या मिल ला भीषण आग लागली. या आगीत रवा तयार करण्यासाठी साठवण्यात आलेले धान्य व रिकामी बरदाने, गोण्या जळून खाक झाले.या.पालिकेच्या तीन अिग्नशमन बंब पैकी दोन बंब हे लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर होणार्या नेत्यांच्या सभेसाठी गेलेले असल्याने एकच बंब घटनास्थळी पोहचला.खाजगी टँकर व अग्निशमन दलाच्या बंबानी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मिल मध्ये ठेवण्यात आलेल्या रिकाम्या गोण्या व बरदाने या मुळे आगीने कमी वेळात रौद्र रूप धारण केले होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्ना नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात पथकाला यश मिळाले.आद्योगिक वसाहतीत लागलेल्या या आगीमुळे एकच खळबळ उडाली. सध्या उन्हाच्या तिव्रतेमध्ये वाढ झाली असून पाणी टंचाई मुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अडचणी येत होत्या. रविवार असल्याने कामगारांना सुटी होती म्हणून सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी इलेक्तिट्रक शॉर्ट सिर्कट मुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ( 21मनमाड फायर) ( 21मनमाड फायर०१)
मैदा तयार करणाº्या मिल ला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 17:39 IST
मनमाड: येथील नांदगाव रोडवरील बुरकुल वाडी भागातील एन आर फ्लोअर मिल या रवा व मैदा तयार करणाº्या मिल ला भीषण आग लागली. या आगीत रवा तयार करण्यासाठी साठवण्यात आलेले धान्य व रिकामी बरदाने, गोण्या जळून खाक झाले.
मैदा तयार करणाº्या मिल ला भीषण आग
ठळक मुद्दे मिल च्या खिडकीतून धुर निघत असल्याची बाब बुरकुल वाडी भागातील नागरिकांच्या निदर्शनास आले.त्यांनी मिल चे मालक बेडमुथा यांना कळविले.काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले