जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीनं पार पडला. फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करत कार्यक्र माचे आयोजन केले गेले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलातील अधिकारी अक्षय मढवई उपस्थित होते. गुरु कुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता दहावी परीक्षेत द्वितीय क्र मांकाने उत्तीर्ण झालेल्या स्नेहल मढवई या विद्यार्थिनीला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गुरु कुलाचे विश्वस्त हेमंत शहा, मच्छिंद्र वरे, प्रकाश भामरे, डॉ. दिवाकर सुताने, संत कंकाली महाराज, पुरणगावचे उपसरपंच बाळासाहेब ठोंबरे, परशराम वरे, सुखदेव मढवई, बाळासाहेब मढवई आदी उपस्थित होते. योगेश सोनवणे, राजेश पाटील, रविंद्र राजगुरू यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
आत्मा मालिक विद्यालयात ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:56 IST
जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीनं पार पडला.
आत्मा मालिक विद्यालयात ध्वजारोहण
ठळक मुद्दे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलातील अधिकारी अक्षय मढवई उपस्थित होते.