शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणात पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: June 9, 2017 20:21 IST

दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नाशिक : दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कैलास चंदू रायघोळ (४५, रा़आम्रपालीनगर, कॅनॉलरोड, नाशिकरोड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी शुक्रवारी (दि़९) पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ २९ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती़आम्रपालीनगरमध्ये राहणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीसोबत कैलास रायघोळ याने अतिप्रसंग केला होता़ या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांच्या न्यायलयात सुरू होता़ सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी नऊ साक्षीदार तपासले़ यामध्ये मुलीची, डॉक्टरांची व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली़ तर महिला पोलीस उपनिरीक्षक पी़बीक़ेदार यांनी या गुन्ह्याचा तपास केला़न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यानुसार आरोपी कैलास रायघोळ यास बलात्काराच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास तर पोस्को कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़ या शिक्षा कंक्टीट भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे़