शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; पंधरवड्यात दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 20:48 IST

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील औद्योगिक वसाहतीजवळ संध्याकाळी बिबट्याने एका पाच वर्षाच्या बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाला

ठळक मुद्देएका घराजवळ खेळत असलेला विवेक राजदेव बिंद या मुलावर बिबट्याने ऊसाच्या शेतामधून येत अचानकपणे हल्ला केलापंधरवड्यापासून दिंडोरी तालुक्यामधील कादवानदीचा काठ बिबट्याने थरारत आहे.

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील औद्योगिक वसाहतीजवळ संध्याकाळी बिबट्याने एका पाच वर्षाच्या बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाला आहे. मागील पंधरवड्यापासून दिंडोरी तालुक्यामधील कादवानदीचा काठ बिबट्याने थरारत आहे.याबाबत वनविभाग दिंंडोरी वनपरिक्षेत्राकडून मिळालेली माहिती अशी, लखमापूर फाटा येथे औद्योगिक वसाहतीत उसक्षेत्राला लागून असलेल्या एका घराजवळ खेळत असलेला विवेक राजदेव बिंद या मुलावर बिबट्याने ऊसाच्या शेतामधून येत अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विवेकचा मृत्यू झाला.याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच वनविभागाच्या कर्मचाºयांनीही पंचनामा करुन वनविभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सुमारे आठ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्यशासनाच्या वनमंत्रालयाकडून केली जाते.कादवा काठालगत बिबट्याने धुमाकूळ घातला असून या भागात एकूण पाच पिंजरे तैनात करण्यात आले आहे; मात्र अद्याप बिबट्या जेरबंद होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंधरा दिवसांपुर्वीच बिबट्याने एका तीन वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला करून ठार केले होते. या हल्ल्याची घटना ताजी असताना पुन्हा बिबट्याने गुरूवारी संध्याकाळी केलेला मुलावरील हल्ला अत्यंत दुर्देवी आहे. ऊसाची शेती जास्त असून या भागात बिबट्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध झाल्यामुळे बिबट्याला जेरबंद करणे अवघड होत आहे.