शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा तहसीलच्या पथकाने पकडली चोरट्या वाळूने भरलेली पाच वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:09 IST

सटाणा : येथील तहसील विभागाच्या वाळू तस्करी विरोधी पथकाने दोन दिवसात चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व एक ट्रॅक्टर अशी पाच वाहने पकडून दंडात्मक कारवाई केली.

ठळक मुद्देसुमारे साडे सात लाख रु पये दंडात्मक कारवाई

सटाणा : येथील तहसील विभागाच्या वाळू तस्करी विरोधी पथकाने दोन दिवसात चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व एक ट्रॅक्टर अशी पाच वाहने पकडून दंडात्मक कारवाई केली.वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी स्वत: बाळू तस्करी विरु द्ध पथक तयार केले असून गेल्या महिन्यापासून धडक मोहीम हाती घेतली आहे. या पथकाने गेल्या दोन दिवसात चिराईबारी, नामपूर, लखमापूर रस्ता तसेच वीरगाव नजीक कान्हेरी नदीपात्रात सापळा रचून चार ट्रक आणि एक वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर अशी पाच वाहने पकडली.पथकातील कर्मचारी मेजर मच्छिंद्र मोरे यांना कान्हेरी नदीपात्रात ट्रॅक्टरने वाळूची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मोरे यांनी वीरगाव नजीक सापळा रचून जॉनिडयर कंपनीचा ट्रक्टर (एमएच ४१ ए ए ३१९६) चोरटी वाहतूक करतांना रंगेहाथ पकडले. पथकाने वाळूसह ट्रॅक्टर जप्त केला असून १ लाख ३० हजार रु पये दंड ठोठावला आहे.दरम्यान चिराईबारी मार्गे साक्र ी-लखमापूर या मार्गाने वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहे. नंदुरबार कडून तापी नदीतून बेकायदा वाळूचा उपसा करून नाशिक, मुंबईकडे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. याला चाप लावण्यासाठी चिराईबारी तसेच नामपूर लखमापूर रस्त्यावर भरारी पथके ठेवण्यात आले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक (एमएच १८ बीजी ७५२७), (एमएच १५ सीके ८३१०), (एमएच ४१ जी ७३७०) हे ट्रक चिराईबारी मार्गे वाळूची चोरटी वाहतूक करतांना आढळून आले. दोन वाहने पथकाला पकडण्यात यश आले. मात्र दोन वाहने पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना सिनेस्टाईल पाठलाग करून लखमापूर नजीक पकडण्यात यश आले. या चारही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे साडे सात लाख रु पये दंडात्मक कारवाईची नोटीस संबधितांना बजावण्यात आली आहे.