शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली सेट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:22 IST

उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर प्राध्यापक होण्यासाठी शहरातील विविध १३ केंद्रांवर पाच हजार २८५ विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.२८) राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा (सेट) दिली. सर्व परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिन्य पातळी आणि अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे सेट परीक्षा अवघड गेल्याची प्रतिक्रिया परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

नाशिक : उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर प्राध्यापक होण्यासाठी शहरातील विविध १३ केंद्रांवर पाच हजार २८५ विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.२८) राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा (सेट) दिली. सर्व परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिन्य पातळी आणि अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे सेट परीक्षा अवघड गेल्याची प्रतिक्रिया परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगून वरिष्ठ महाविद्यालयात किंवा विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शहरातील १३ केंद्रांवर राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ८३ टक्के उमेदवारांची उपस्थिती होती. परीक्षेसाठी एकूण सहा हजार ३७९ परीक्षार्थींपैकी पाच हजार २८५ विद्यार्थी प्रविष्ट होते. तर १०९४ परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली. मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, सहायक समन्वयक परेश शिऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र या परीक्षेत प्रश्नांची काठिन्य पातळी वाढविण्यात आल्याने पहिला पेपर अवघड गेल्याची प्रतिक्रि या परीक्षार्थींनी दिली आहे. सेटचा पहिला पेपर जनरल नॉलेज १० ते ११.१५ या वेळेत तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर ११.४५ ते १ आणि तिसरा संबंधित विषयाचा पेपर २.३० ते ५ या वेळेत घेण्यात आला.पहिल्या समावेशक विषयाच्या पेपरमध्ये अवघड प्रश्न विचारण्यात आल्यान परीक्षार्थींना पेपर अवघड गेला, तर विशिष्ट विषयांशी संबंधित पेपरमध्ये काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याने हे पेपरही अवघड होते. परंतु बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमुळे पेपर वेळेत पूर्ण झाले. - अश्विनी आडके, सेट परीक्षार्थी

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा