शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पाच हजार सोसायट्या सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 19:17 IST

नाशिक : ग्रामीण भागातील शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम होणे गरजेचे असल्याने प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांचे पंधरा ते वीस सोसायट्या नव्याने स्थापन कराव्यात, राज्यात अशाप्रकारे नव्याने पाच हजार सोसायट्यांचे बळकटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.नाशिक येथे सहकार विभागाच्या बैठकीनंतर ते ...

ठळक मुद्देसुभाष देशमुख : प्रत्येक तालुक्यात सहायक निबंधक कार्यालयसरकारने पुन्हा कर्जमाफीसाठी १ ते ३१ मार्चदरम्यान संधी उपलब्ध करून दिली

नाशिक : ग्रामीण भागातील शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम होणे गरजेचे असल्याने प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांचे पंधरा ते वीस सोसायट्या नव्याने स्थापन कराव्यात, राज्यात अशाप्रकारे नव्याने पाच हजार सोसायट्यांचे बळकटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.नाशिक येथे सहकार विभागाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आपण भेट देऊन शेतकरी कर्जमाफी तसेच बाजार समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेत असून, अद्यापही सन २००९ पासून पीककर्ज थकलेल्या शेतक-यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नसल्यामुळे सरकारने पुन्हा कर्जमाफीसाठी १ ते ३१ मार्चदरम्यान संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील शेतक-यांना कर्जासाठी बॅँकांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून विविध कार्यकारी सोसायट्यांची संख्या वाढावी व त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असून, त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांची महत्त्वाची भूमिका असल्याने सोसायट्यांनी डिपॉझिट जमा करावेत व त्या आधारे सहकारी तत्त्वावर नवनवीन व्यवसाय ग्रामीण भागात सुरू करावेत यासाठी पाच हजार सोसायट्यांचे बळकटीकरण करण्याच्या सूचना सहायक निबंधकांना देण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. नाशिक जिल्ह्यात भाजीपाला व फळपिके मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने त्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल, असे सांगून मकापक्रिया उद्योगांकडून सेस मिळत नसल्याने तो मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील व तसेच प्रत्येक तालुक्यात सहायक निबंधकांची कार्यालये सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, त्यासाठी सरकारकडून जागा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक