शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार चिंचोक्यांचा श्रीगणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:51 IST

पर्यावरणाला कोणताही धोका पोहचू नये तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा म्हणून पंचवटीतील पाथरवट लेन येथील लक्ष्मीछाया सदनिकेतील लक्ष्मीछाया मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही जवळपास पाच हजार चिंचोक्यांपासून गणेशाची मूर्ती साकारून इको फ्रेंडली देखावा साकारून पर्यावरण बचावचा संदेश दिला आहे. मंडळाने आतापर्यंत बांगड्यांचा गणेश, बांबूपासून गणेश, फळे, फुले, चॉकलेट, कुंड्या, गूळ आदी वस्तूंपासून गणेशमुर्ती साकारून इको फ्रेंडली देखावे सादरीकरण केले आहे. इको फ्रेंडली देखावे साकारण्याचे मंडळाचे यंदा १९ वे वर्ष आहे.

पंचवटी : पर्यावरणाला कोणताही धोका पोहचू नये तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा म्हणून पंचवटीतील पाथरवट लेन येथील लक्ष्मीछाया सदनिकेतील लक्ष्मीछाया मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही जवळपास पाच हजार चिंचोक्यांपासून गणेशाची मूर्ती साकारून इको फ्रेंडली देखावा साकारून पर्यावरण बचावचा संदेश दिला आहे.मंडळाने आतापर्यंत बांगड्यांचा गणेश, बांबूपासून गणेश, फळे, फुले, चॉकलेट, कुंड्या, गूळ आदी वस्तूंपासून गणेशमुर्ती साकारून इको फ्रेंडली देखावे सादरीकरण केले आहे. इको फ्रेंडली देखावे साकारण्याचे मंडळाचे यंदा १९ वे वर्ष आहे. पर्यावरणाला हानी पोहचू नये यासाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वत:च विविध वस्तूंपासून गणेशाची मूर्ती तयार करतात. ध्वनिक्षेपकाचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मंडळाकडून कोणतेही वाद्य वा ध्वनिक्षेपक न लावता गणेशोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मीछाया सदनिकेतील रहिवासी मंडळाचे सदस्य असून दरवर्षी आवश्यक तितकीच वर्गणी जमा करून देखावे साकारण्याचे काम केले जाते. मंडळाचे अनुप महाजन, सागर जाधव, उमेश ढगे, अविनाश वानखेडकर, हरी घोडके, अक्षय शिंदे, सुभाष राऊत, संकेत वाघ आदींसह सदनिकेतील सदस्य कामकाज बघतात.होमगार्डच्या भरवशावर बंदोबस्तनाशिक : उत्सव काळातील गुन्हेगारी घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता गणेशमंडळांना पोलीस बंदोबस्त पुरविणे अपेक्षित आहे. मात्र सध्या काही मंडळांना पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला असताना काहींना मागणी करूनही बंदोबस्त देण्यात आलेला नाही. या मंडळांना अजूनही पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा आहे, तर शहरातील काही मंडळांना होमगार्ड बंदोबस्तासाठी देण्यात आलेले आहेत.